पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ टिळकाविषयी चिरोलचे अखेरचे मत ११३ बरीला येतील. गांधींचा सौम्यपणा व विनय टिळकांच्या अंगी नव्हता. पण बुद्धि- मत्ता व राजकारणातील मार्मिकपणा हा गुण गांधीपेक्षा टिळकांच्या अंगी फार अधिक प्रमाणाने होता. आपल्या धर्मावर त्यांचा अढळ व दुर्दम असा विश्वास होता. त्या विश्वासामुळे इतर धर्माना ते तुच्छ मानीत. पुढाऱ्यांचे गुण त्यांच्या अंगी जन्मसिद्ध म्हणजे स्वयंभूच होते व एकदा युद्ध जुंपले म्हणजे ते त्यात कोणालाच दयामाया दाखवीत नसत. ब्राह्मण वर्ग क्षत्रियाहून श्रेष्ठ म्हणून त्यानी तरवारीने कधी युद्ध केले नाही. फक्त लेखणी व जिव्हा हीच त्यांची हत्यारे त्यानी वापरली. ते इंग्रजी भाषा चांगली लिहित व बोलत. स्वतःच्या खडबडीत पण जोरदार मराठी भाषेत तर ते कोणालाच हार जात नसत. ते उदयाला येण्याचे सुमारास रानडे चंदावरकर भांडा- रकर वगैरे प्रागतिकानी काढलेल्या प्रार्थना समाजाचे बस्तान बरेच बसले होते. पण टिळकांच्या दृष्टीने असले लोक सरकारच्या भोंवती गोंडा घोळणारे व इंग्रजी राज्याचे गुलाम होते. इंग्रजी राज्यावर हल्ला करण्यापूर्वी प्रथम या लोकाना चिरडून टाकले पाहिजे असे टिळकाना वाटे. म्हणून त्यांच्या विरुद्ध आपल्या वक्तृत्वाचा पहिला सपाटा टिळकानी सुरू केला. सतराव्या शतकातील आमच्या राऊंडहेड लोका- प्रमाणे टिळकांच्या भाषणात धार्मिक विचार व कल्पना यांची रेलचेल असे. वर्तमानपत्रे व सभा यातून टिळकांची गर्जना चालू होती. आणि अनुयायांच्या प्रचंड संख्येने व त्यांच्या धाकाने ते प्रतिपक्षाला दडपून व तुडवून टाकीत. संमतिवयाच्या बिलाविरुद्ध पुराणमतवादी लोकांचे मुख्य पुढारी म्हणून त्यानी मोहीम केली. सरकारने धर्मात नव्या कायद्याने हात घातल्याने लोकांचे पार- लौकिक अकल्याण होईल असे म्हणून टिळकानी सरकारचा तीव्र निषेध केला. या त्यांच्या विचारसरणीने ब्राह्मणाप्रमाणे ब्राह्मणेतर देखील टिळकाना वश झाले. सरकारने कायदेमंडळात हे बिल मंजूर केले पण तो विजय नसून पराभव ठरला. कारण राष्ट्रात इतकी खळबळ झाली की पुन्हा असे न करण्याविषयी सरकारने कानाला खडा लावून घेतला ! टिळकांचे वजन परप्रांतात वाढत होते तरी आपल्या प्रांतात आपले वजन कायम राहावे असेच त्यानी प्रयत्न ठेवले. मराठे जातीच्या चालीरीती व भावना यांची त्याना पूर्ण ओळख होती. आणि स्वतः श्रेष्ठ वर्णाचे म्हणून त्याना गणपती उत्सवासारख्या प्रसंगातून व शिवाजी उत्सवातून मुसलमान व इंग्रज सरकार यांचे विरुद्ध भावना जागृत करिता आल्या. युरोपातील राजकीय चळवळीचा अभ्यास करून त्यापासून बोध घेणे व त्यांचा उपयोग हिंदी राजकारणात करणे ही गोष्ट टिळकानीच प्रथम केली. १८९६ साली त्यानी दुष्काळाच्या प्रसंगी शेतकन्याना हाती धरून चळवळ केली ती आयर्लंडमधील