पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ निकालानंतर जी खासगी रक्कम त्यांचेजवळ शिल्लक होती ती अडीअडचणीच्या वेळी केसरी व वाडा अवचित लिलावाला निघू नयेत याकरिता त्यानी दूरदृष्टीने शिल्लक ठेवलेली होती. आणि तीच शिल्लक त्यांची त्याना परत मिळाली याहून दुसरे काही नाही. हा फंड उभारल्याबद्दल त्याना व त्यांच्या अनुयायाना नावे ठेवणारे काही मूर्ख व दुष्ट लोक निघाले होते. पण त्याना आतील काहीच माहिती नव्हती. आणि "मुलाना पैसा शिल्लक ठेवण्याकरिता टिळकानी हा फंड उभारविला" या त्यांच्या विधानासारखे खोटे व अधमपणाचे विधान असूच शकणार नाही. पण असली विधाने कोणीहि समंजस मनुष्याने केलेली नाहीत. व वरच्या आक्षेपा- प्रमाणे लोकाना जर खरोखरच वाटले असते तर एवढी रक्कम जमलीच नसती ! पण आक्षेपकानाहि स्वतः टिळकाना नावे ठेवण्याचे धैर्य नसल्यामुळे "लोक असे असे म्हणतात" असे म्हणून ते टिळकाना स्वतःच्या मनचेच लिहित होते. निंदक मनुष्याची ही एक नेहमीची युक्तिच असते. मनातून दुसऱ्याची निंदा कराव- याची पण तोंडाने म्हणावयाचे की " काय लोक वाईट ! ते तुम्हाला असे असे म्हणतात." असे म्हटल्याने निंदा करणाराचे समाधान झाले व स्वतःवरची जबाब- दारी टळली. या आक्षेपकापैकी कित्येक असे खमंग होते की ज्यानी जन्मभर लोकाना बुडविण्याशिवाय दुसरा धंदा केला नाही. घरभाड्याच्याहि फिर्यादी करून घेतल्या. आणि टिळकांचे निरपेक्ष निकटचे व स्नेही म्हणत म्हणत त्यानी केसरी कडील पैसे घेऊन कसे बुडविले याची साक्ष केसरीच्या वहीखात्यात केव्हाह मिळणारी आहे. स्वतः या निंदकानी या संकटात टिळकाना मदत काय केली है। कोणी विचारले असता ते काय उत्तर देतील ? लोकांचे नाव सांगून टिळकाना लोभी म्हटले एवढी शहाजोग मदत केली खरी ! (२२) टिळकाविषयीं चिरोलचे अखेरचे मत शेवटी चिरोल साहेबांचे टिळकाविषयी जे अखेरचे मत होते त्यासंबंधी एक उतारा देऊन हे प्रकरण संपवितो. चिरोल साहेबानी आपल्या पहिल्या पुस्तकात टिळकाविषयी जसे लिहिले तसे त्यानी अलीकडे दोन तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या 'इंडिया' नामक पुस्तकात लिहिले नाही. त्या व या लिहिण्यात कोणालाहि फरक दिसून येतो. या नंतरच्या पुस्तकात चिरोल साहेबानी टिळकांचे वर्णन दिले आहे ते असे :- "टिळक हे पुण्याचे ब्राह्मण. जातीने चित्पावन, चित्पावन ब्राह्मण वर्ग हा ईश्व- राचा मोठा लाडका असा हक्क तो वर्ग नेहमी सांगत असतो. पुराणमतवादी काय किंवा सुधारणावादी काय कोणतीही बाजू घेतली तरी हल्लीच्या काळी या चित्पावन जातीने जितके कर्तृत्ववान व शीलसंपन्न पुढारी निर्माण केले तितके इतर कोणत्याहि जातीने केले नाहीत. टिळक हे पुराणमतवादी वर्गापैकी होते. हल्लींच्या काळी त्यांच्या इतका लोकोत्तर पुरुष कोणीच झाला नाही. कदाचित् गांधी त्यांच्या बरो-