पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ चिरोल प्रकरणातला खर्च १११ पाण्याचा खर्च हि दोन्ही पक्षकार मिळून देतात असे दिसते. कारण टिळकाना तो दररोज बारा तेरा पौंडप्रमाणे द्यावा लागला. लघुलेखकाची हकिकत छापण्याचा रोजचा खर्च फीसुद्धा ७५ पौंड व किरकोळ १० पौंड अशा रीतीने दहा दिवस खटला चालण्याचा खर्च सुमारे ३६०० पौंड झाला. तरीहि सॉलिसीटर यानी लिहून कळविलेंच की 'आम्ही तुमच्याकरिता फार कसोशीने थोड्या खर्चात भाग- वीत आहो.' याशिवाय प्रतिवादीच्या खर्चाकरिता जामिनकीची रकम ठेवण्याचा तगादा लागला तो वेगळाच. चिरोल केसकरिता विलायतेला निघताना टिळक जवळजवळ कफल्लक बनून निघाले होते. घरसुद्धा गहाण पडले होते. आणि केस हरल्यास किंबहुना केस तडीला नेण्यासहि लागण्याइतके पैशाचे बळ केसरीजवळ नव्हते. अर्थात खटला आपण हरलो तर काय करणार याचा विचार त्यांच्या मनात येऊन गेलाच असला पाहिजे. एका आठवणीत असे लिहिले आहे की "विलायतेस निघण्यापूर्वी विश्वासातील मंडळी जवळ घेऊन त्याना टिळक म्हणाले " खटला माझ्यासारखा झाला तर मला मिळणाऱ्या पैशाचे मी काय करणार हे सांगावयास नको. पण खटला अंगावर आला तर परत येताच मी एक वर्षांची हक्काची रजा केसरी- कडून घेऊन माझे अपूर्ण राहिलेले ग्रन्थ पुरे करून त्यावर हजारो रुपये मिळ- वून त्यातून ऋणमुक्त होईन. माझ्या ग्रन्थांचा योगच असा असतो की ते अड- चणीच्या वेळीच लिहून होतात, " पुढे खटला बुडाला असे इकडे कळल्यावरहि फंड सुरू करण्याला टिळकानी लिहिले नव्हते. पण केसरी किंवा टिळकांचा वाडा जतीत निघावा ही गोष्ट त्यांच्या अनुयायांच्या मनाला शिवेना. म्हणून टिळकां- कडून संमतीचा नव्हे पण एखाद्या सूचनेचा शब्दहि येण्यापूर्वी केवळ स्वयंस्फूर्तीने अनुयायानी व मित्रानी फंड जमविण्यास सुरवात केली. लोकाना न विचारता खटल्याला हात घातला म्हणून त्याचा परिणामहि माझा मीच भोगला पाहिजे ही टिळकांची भावना योग्य व सात्त्विक होती. पण वस्तुतः या खटल्यात टिळकांची व्यक्तिशः कोणत्याहि तन्हेची बदनामी नव्हती. तर स्वतः पुढारी होऊन त्यानी चालविलेल्या एकंदर चळवळीचाच तो इनसाफ होता. आणि या चळवळीत आपण सर्वच भागीदार आहोत या भावनेने लोकानी फंड जमविला. प्रथम इकडे फंड जाहीर केला तेव्हा खर्चाची नक्की कल्पना टिळकांच्या कडून आली नव्हती. मित्रमंडळीनी विचारल्यास सालिसिटरकडून कळेल व मग ती कळवू असे ते लिहीत. म्हणून केवळ अंदाजी आकडा ठरवून फंडाला सुरवात झाली. तो लाख पन्नास हजारानी कमी पडला असता तरी टिळकाना काही वाटले नसते. आणि वर सांगितल्या- प्रमाणे ग्रंथ लिहून व इतर रीतीने कर्ज अंगावर घेऊन त्यानी ते फेडले असते. पण फिर्यादीचा एकंदर खर्च भागविण्याइतका फंड प्रत्यक्ष जमल्यावर लोकानी तरी त्यातील काही शिल्लक ठेऊन व तितका बोजा टिळकावर लादून काय साधावयाचे होते ? या फंडापैकी व्यक्तिशः टिळकाना एक पैहि कोणी दिली नाही. व केसच्या