पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० लो० टिळकांचे चरित्र भाग ४ जामिनकीदाखल कोर्टात रुपये भरण्याचा. या बाबत प्रतिवादीकडून विलायतेतील खर्चाकरिता चार हजार व हिंदुस्थानात येणाऱ्या कमिशनकरिता ८०० मिळून एकंदर सुमारे पाच हजार पौंडाची मागणी करण्यात आली. टिळकांच्या सॉलि सिटरनी याला हरकत घेतली व रक्कम ठरविण्याची बरीच घासाघीस झाली. कमिशन परतून गेल्यावर चिरोलसाहेबांच्या सॉलिसिटरने कोर्टाला अर्ज करून टिळकांकडून खचीच्या जामिनकीबद्दल आणखी रक्कम घ्यावी अशी मागणी केली. ही रक्कम कशी कशी वाढत गेली ती पाहा. सुरुवातीला सात आठशे पौंड ठेवावे लागले. नंतर १९१७ च्या मार्चमध्ये आणखी एकवीसशे पौंड ठेवावे लागले. मिळून तीन हजार पौंडांची रक्कम आधीच झाली होती. हीच रकम गैरवाजवी आहे अशी टिळकातर्फे तक्रार करण्यात आली. पण कोर्टाने ती अमान्य केली. यानंतर कमिशन निघण्याचा हुकूम झाला आणि ते परत आल्यावर वर सांगितलेली ही फिरून मागणी झाली. त्यात नुसते मुंबईचे सॉलिसिटर लिटल् आणि कंपनी यांचेच बिल ८६४३२ रुपयांचे दाखविले गेले. आणि कमिशनचे काम किती दिवस चालले होते म्हटले तर अवघे पंचवीस दिवस ! हे ८६४३२ व चिरोलसाहेबानी पूर्वी वेळोवेळी खर्च केलेले ७००० पौंड हा तोपर्यंत प्रतिवादीचा खर्च झाला असे सॉलिसिटरने सांगितले. पण यापुढे आणखी खर्च होणारच होता. सॉलिसिटरचे म्हणणे असे की " प्रतिवादी व वादी या दोघांचा पुरावा पाहता तो दहावीस हजार फोलियो ( बंद ) इतका भरेल. इतक्या सर्वांचा विचार कोटीपुढे होणार. इतके सर्व कागद प्रतिवादीच्या बॅरिस्टराना वाचावे लाग- णार. प्रतिवादीने तीन बॅरिस्टर दिले आहेत. त्यांची फी फार जबर आहे. ती सर्व मिळून पाच हजार पौंड होईल. शिवाय सॉलिसिटर यांची फी वेगळीच. तरी वादोने कोर्टात भरलेल्या तीन हजाराशिवाय आणखी दहा हजार पौंड त्याने अमानत ठेवण्याचा हुकूम व्हावा !" या कज्जात टिळकांचे मुंबईतील सॉलिसिटर राघवय्या व नगीनदास हे होते. यानी टिळकाकडून शक्य तितकी कमीच की घेतली. तथापि त्यांचे अखेर बिल आले ते पाच हजार रुपयांचे होते. मुंबईच्या नुसत्या भाषांतरकाराची फी जवळ जवळ तीन हजार झाली. यावरून विलायतच्या सॉलिसिटरची फी किती झाली असेल याचा अंदाज सहज करता येईल. सर जॉन सायमन याना प्रथम कागदपत्र वाचण्याकरिता पंधराशे पौंड, दुय्यम बॅरिस्टरला कागद वाचण्याकरिता दहाशे पौंड, दोघांची कारकून फी सुमारे दोनशे पौंड, दोघाना एक वेळ भेटण्याची फी पसतीस पौंड, स्वतः सॉलिसीटर यांची कागदपत्राची फी दहाशे पन्नास पौंड, अशा रीतीने नुसत्या कागदपत्रांच्या धूळ- भेटीला सुमारे अडतीसशे पौंड खर्च आला. याशिवाय खटला चाले तेव्हा रोजचा खर्च सुमारे तीनशे पौंडांचा व्हावा असा अंदाज होता. विलायतेत ज्यूरीचा चहा-