पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ चिरोल प्रकरणातला खर्च १०९ अजून काळोखच. आयर्लंडची करुण कहाणी संपली तरी तिची आठवण हवी असेल तर कोणीहि यांच्याकडे पहावे !" केसरीच्या लंडनच्या बातमीदाराने कार्सन साहेबासंबंधी ता. १७ जुलै १९१९ च्या बातमीपत्रात खालीलप्रमाणे लिहिले होते:- " ता. १२ जुलै रोजी बेलफास्ट येथे अल्स्टरवाल्यानी एक प्रचंड सभा भरविली होती व तीत कार्सनसाहेवानी आयरिश क्याथोलिकांना मनसोक्त शिव्या देऊन बंड करण्याची धमकी घातली. सुमारे सवादोनशे वर्षापूर्वी बॉईन नदीच्या काठी प्रॉटेस्टंट इंग्रजी सैन्याने क्याथोलिक आयरिश बंडवाल्यावर जो मोठा जय मिळविला त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी या दिवशी अल्स्टरवाले अशीच सभा भर- वीत असतात. शिवाजी व अफझुलखान यांच्या युद्धाविषयी खुली चर्चा करणे हिंदुस्थानात निषिद्ध आहे. पण संभाजीच्या मृत्यूच्या साली प्रॉटेस्टंट व क्याथो- लिक यांच्या दरम्यान आयर्लंडात झालेल्या युद्धाची चर्चा इकडे खुशाल हवीं तशी करिता येते. येवढेच नव्हे तर प्रॉटेस्टंट लोकांना क्याथोलिक लोकांचा धर्म- गुरु जो पोप त्याची प्रतिमा चवाट्यावर जाळता येते. अशा अपमानामुळे मने चितली न जाण्याइतके आयरिश लोक निगरगट्ट आहेत म्हणावे तर तसेहि नाही. कारण अत्याचारांची खाई आयर्लंडामध्ये रात्रंदिवस पेटलेलीच आहे. असे असता दारूने भरलेल्या तळघरात जळती मशाल टाकण्याच्या अपराधाबद्दल सर एडवर्ड कार्सन यांच्यावर सरकार खटला करीत नाही ! आणि याच कार्सनसाहे- बानी टिळकांचा मुकदमा चालू असता चिरोलसाहेबांचे वकील या नात्याने टिळकावर कसकसे तोंड टाकले हे केसरीच्या वाचकास स्मरत असेलच. कार्सन- साहेबाना कायदा लागतो की नाही असा एका सभासदाने पार्लमेंटात प्रश्न केला. पण बोनर लॉ यानी त्याला केवळ धरसोडीचे उत्तर दिले ! " (२१) चिरोल प्रकरणातला खर्च चिरोल प्रकरणी खर्चाविषयी टिळकांचा अंदाज चुकला तलेच आहे. त्याचा प्रकार असा. मागे सांगि- १९१६ च्या जून महिन्यात टिळकानी प्रथम सॉलिसिटरना ६०० पौंड पाठविले व त्याबरोबर सॉलिसिटरनी नोटीस कशी द्यावी, कैफियतीला हरकती कोणत्या घ्याव्या, मुकदम्याचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे, चिरोलसाहेबाच्या बुकातील नक्की हरकत घेण्यासारखी विधाने कोणती, वगैरेसंबंधाने सुमारे शंभर पानांचे टिपणहि करून पाठविले. पण फिर्याद दाखल झाल्याबरोबर पैशाच्या मागणीने आपले तोंड उघड- ण्याला प्रारंभ केला. पहिला दणका टिळकानी प्रतिवादीकारता कोर्ट खर्चाच्या