पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ ला म्हणून त्यांचे धैर्य आणखी विशेष. कार्सन हे आवेशाचे मूर्तिमंत पुतळे होते. पण त्यांच्यांत देशभक्ति होती असे मात्र म्हणता येत नाही. कारण त्याना देश असा नाही. फक्त त्यानी एक विशिष्ट पक्ष उचलला होता. त्यानी पक्ष बदलला नाही असेहि नाही. आणि ह्या पक्ष बदलण्याबद्दल लोकानी दोषारोप केले तेव्हा ते खोटे बोलले हे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. आयरिश देशभक्ताना स्वातंत्र्य तर नाहीच पण सरसकट तुरुंग दाखवू अशी लॉर्ड सॅलिसबरी यानी प्रतिज्ञा केली. त्यावेळी ते कार्य करण्याला कार्सन साहेब पुढे सरसावले. आणि इतर अनेक बुभुक्षित आय- रिश स्त्री पुरुषांप्रमाणे त्यानी प्रधानमंडळाकडून फायदा करून घेतला. त्यांचा आवेश असा की भापण करिताना त्यांच्या डोळ्यातून अनुहि येत. आणि या आवेशात सरकारी सत्तेला विरोध करून बंड करण्याचा धाक ते उघड घालू शकत. " जगात चांगली बाजू अशी त्याना दिसतच नव्हती. गांवढळ मनुष्याच्या आंगचे गुण त्यांच्यामध्ये होते. उदात्त ध्येय कसे असते हे त्याना माहितच नव्हते. त्यांच्यापुढे एखादा कवि नेऊन बसविला तर त्याची जिव्हाच बंद होईल. त्यांच्याकडे पाहिले म्हणजे हा मनुष्य क्रूर रानटी असावा असा भास होतो आणि वाटते की स्वतः वध केलेल्या मनुष्यांच्या नर-कपालांची माळ हा घरी विसरून आला आहे इतकेच. नाटकात एखाद्या अतिदुष्ट मनुष्याचे पात्र घालावयाचे झाल्यास त्याची भूमिका घेण्याला यांच्या सारखा मनुष्य मिळणार नाही. ज्याला हा लाभेल त्याच्या शत्रूचें वाटोळे व्हावयाचेच. वकिलातील हे एक पेंडच होते. मऊ न्यायाधीश मिळाला म्हणजे मग हा अगदी सौम्य. पण याने कोर्टापुढे येऊन साधी हरकत घेतली तरी आभाळात गडगडल्याचा भास होतो. न्यायाधीश थोडा टणक मिळाला म्हणजे मग याहीपेक्षा त्यांचे उग्र स्वरूप दिसून येते. ज्यूरीला जरब देण्यात यांचा हात- खंडा आहे. खटल्यात राजकारणाचा उपयोग कसा कुशलतेने करावा प्रतिपक्षाला दुष्ट हेतू कसे चिकटवावे हे ह्यांच्यापासून शिकावे. यांची उलट तपासणी सुरू झाली म्हणजे साक्षीदाराला पिंजऱ्यातून पळून जावेसे वाटते. राजकीय विषयावर भाषण करिताना इतकी द्वाड जात दुसरी कोणची आढळत नाही. भाषणात कोठे चुकूनहि उदार विचार किंवा रम्य विनोद आढळावयाचाच नाही. जातें भरडावे तसे सगळे भाषण कठोर व टणक, तरी पण त्याना एक प्रकारची लोकप्रियता लाभली.. ज्याच्या रोमरोमातून भांडखोरपणाचा धूर निघत असतो असेच लोक नेहमी पार्ल- मेंटाला प्रिय होतात. सरकारच्या जोरावर आयर्लंडला यानी जित राष्ट्राप्रमाणे छळले आहे. अधिकाराच्या वरिष्ठ जागा स्नेह्याना मिळवून द्यावयाच्या. पोलि- सांचा व न्यायकोर्टाचा उपयोग हातातल्या काठीप्रमाणे लोकाना सडकावयाला करावयाचा. सुदैवाने हा काल निघून गेला. आणि आयर्लंडात स्वातंत्र्यसूर्य उगवू घातला आहे. पण ह्या प्रकाशाकडे पाठ करून अजून हे गृहस्थ असेच उभे आहेत. अवतार खरा पण दुष्टपणाचा ! रात्र संपली तरी यांच्या अंगावर