पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग 8 खटल्याबद्दल तिऱ्हाइताचे मत १०३ टिळक हे हिंदुस्थानचे व कार्सनसाहेब हे आयर्लंडचे अनभिषिक्त राजे यामुळे या दोघांचे हे वादयुद्ध हिंदुस्थानच्या इतिहासात चिरस्मरणीय होऊन राहील यात शंका नाही. तुम्ही सायमन साहेबाना एक गोष्ट मात्र विशेष वजा- वून सांगा. त्यानी आपल्या ज्यूरीपुढील भाषणात असे सांगितले पाहिजे की आपणास नुकसान भरपाई किती मिळावी यास टिळक महत्त्व देत नाहीत. नैतिक विजयाच्या दृष्टीनेच टिळक या खटल्याकडे पाहतात. आणि तुम्ही टिळ कांच्यातर्फे निकाल देऊन एक शिलिंग जरी नुकसान भरपाईची रक्कम ठरवली तरी ती त्याना चालेल. कार्सन साहेबानी तर कोर्टात फार्सच केला. कार्सन साहेबाना साक्षीदाराने उलथून पाडले आणि मग त्याबद्दल त्यांनी शिरा ताणावयास सुरवात केली हे मी टिळकांच्याच खटल्यात पहिल्यानदा पाहिले. ' घरात खोल्या असतात पण खोली म्हणजे घर नव्हे' हे जे सरकार व नोकरशाही यांच्याबद्दल टिळकानी उदाहरण दिले ते मोठे समर्पक व मार्मिक होते. दुसरी एक विशेष गोष्ट तुम्हाला कळवावयाची ती ही की तुमचे स्नेही व तुमच्या पक्षातील इतर लोक कोर्टात खटला ऐकावयाला येतात ते पुष्कळ वेळा एखाद्या गमतीच्या प्रसंगी मोठ्याने हासतात व आपले मत प्रदर्शित करतात. १९०८ साली टिळकाना शिक्षा झाली तेव्हा गोऱ्या ज्यूरीने त्याना दोषी ठरवले व काळ्या ज्यूरीने ते निर्दोषी आहेत असा निकाल दिला हे वाक्य उच्चारताच कोर्टात तुमच्या मंडळीमध्ये हशा पिकला असे होऊ नये. कारण अशा मतप्रद- र्शनाने येथील ज्यूरीचा टिळकांच्या खटल्याबद्दल वाईट ग्रह होण्याचा संभव आहे. एडगर वालेस यांचे बैपटिस्टाना पत्र लंडन २३ फेब्रुवारी १९१९ तुम्ही अपील करावे असे सायमन सांगतील असे मला वाटत नाही.. कारण या खटल्याच्या आरंभापासूनच येथल्या ज्यूरीने आपला ग्रह कसा दूषित करून घेतला होता हे तुम्ही पाहिलेच ! मुख्यतः सरकार व इंडिया ऑफिस याविरुद्धच टिळकांचे या खटल्यात भांडण होते. आणि चिरोलला आपला खटला तयार करण्यात या दोघानीहि उघडपणे मदत केली हे कोटीमध्ये बाहेर आलेच आहे. खटल्याच्या निकालासंबंधाने लंडन 'टाइम्स'ने दोन अग्रलेख लिहिले आहेत. आणि ' आब्झर्व्हर' पत्रात खटल्याच्या निकालाबद्दल चिरोल साहेबांची मुला- खत हि प्रसिद्ध झाली आहे. या सर्वावरून टिळकांचे नाव काळे करून त्यानी आरंभलेली विलायतेतील होमरूलची चळवळ उलथून पाडावी असा सरकारचा कावा आहे हे उघड दिसते. तुम्ही पासपोर्ट मागितले होते ह्यासंबंधी काय झाले १