पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ लो० टिळकांचे चरित्र भीग ४ यांची त्याना पुरी जाणीव होती. मात्र टिळक चिरोलकेत हरल्यामुळे एक गोष्ट मात्र घडून आली ती ही की पार्लमेटरी कमिटीने इतर शिष्टमंळाबरोबर टिळ- काना आपल्यापुढे साक्षीला बोलाविले परंतु त्यांची उलट तपासणी केली नाही व अशा रीतीने त्यांच्याविषयीची आपली नाराजी प्रगट केलो. वास्तविक हा प्रकार पोरकटपणाचाच दिसला. कारण टिळकाशी कमिटीला चर्चाच करावयाची नव्हती तर त्याना साक्षीलाच येऊ नका असे का म्हटले नाही ? माँटेग्यूसाहेब हे या कमिटीचे एक सभासद होते व ते टिळकांची उलट तपासणी करिते. पण कमिटीत लॉर्ड सिडनहॅम सारखे इतर लोक असल्यामुळे त्यांचे काही चालले नसावे. (१८) खटल्याबद्दल तिन्हाइताचे मत असो. चिरोल खटल्यातील पुरावा जबान्या कशा झाल्या याविषयी एका प्रेक्षकाचे मत खालील पत्रव्यवहारावरून दिसून येईल. एडगर वालेस यांचे बॅर्पोटिस्टाना पत्र लंडन २७ जानेवारी १९१९ चिरोल खटल्याची तारीख २९ जानेवारी ही लागली आहे. या खटल्या- बद्दल येथल्या वर्तमान पत्रातून दोन्ही बाजूंचा पाठपुरावा करण्यात येणार असा रंग दिसतो. अशा वेळी टिळकांची हरकत नसेल तर टिळकांच्याबद्दल व्यक्तिशः गौरवपर असे संपादकीय लेख व या खटल्यात ज्या प्रकारचा साक्षीपुरावा पुढे आला आहे त्याबद्दल येथल्या लोकांचे सहीनिशी लेख छापावे असे मला वाटते. खटला चालू असला तरी टिळक व त्यानी केलेली एकंदर राजकीय चळवळ या- बद्दल लेख लिहिण्याला आम्हास काहीच हरकत दिसत नाही. खटल्यासंबंधी तुम्हीहि एखादे खास आर्टिकल लिहून पाठवाल काय ? एडगर वालेस यांचे बैपटिस्टाना पत्र लंडन २ फेब्रुवारी १९१९ चिरोल केसचे काम उत्कृष्ट चालले आहे व टिळकानी साक्षहि चांगल्या प्रकारे दिली. एक पै देखील नुकसान भरपाई दाखल टिळकाना मिळू नये अशी प्रतिपक्षाची तर कसून खटपट चाललेली असते. कार्सन साहेबांचा आविर्भाव असा असतो की कोणाला वाटावे हा सर्वशक्तिमान व सर्वज्ञ परमेश्वराचाच अव- तार आहे. या त्यांच्या वागणुकीने त्यांच्याबद्दल तिटकारा उत्पन्न होतो. अल्स्टरचा उल्लेख निघताच त्यांची व टिळकांची जी चकमक झाली त्यातहि हा आविर्भाव दिसून आलाच !