पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ चिरोल साहेबांची मुलाखतं १०१ जुंपणार आहे आणि बंड करण्याला हिंदी लोकानी तीच संधि साधावी. या जहाल लोकांची प्रथम अशी कल्पना होती की रशियाशी इंग्लंडचे युद्ध जुंपेल. पण मागाहून ते जर्मनीशी जुंपेल असा त्यांचा अंदाज होऊ लागला. आणि केसरीने तर असे म्हणण्याचा प्रघात ठेवला होता की १८५७ साली झाले ते बंड नसून स्वांत- त्र्याकरिता एक प्रकारचे युद्ध होते. ते फसले म्हणून लोक त्याला बंड म्हणतात इतकेच काय ते ! जर्मन बादशहाला कदाचित् ही गोष्ट माहित असावी. म्हणून काही जहाल लोकापर्यंत प्रेष पोचवून युद्धाच्या पहिल्या दोन वर्षांत लहान मोठे दंगे- धोपे विशेष हेतूने त्याने करविले. आणि या सुमारास टिळकहि उघड बोलून दाख वीत की "उद्या जर्मनीने किंवा टर्कीने हिंदुस्थानावर स्वारी करून देश जिंकून घेतला तरी आमचे त्यात काय गेले ? आहे ते राज्य काय अधिक चांगले आहे ?” माझ्या पुस्तकानंतर नऊ वर्षानी रौलट कमिशनने हिंदुस्थानातील क्रांति- कारक चळवळीचे समालोचन प्रसिद्ध केले त्यात जवळजवळ संबंध एक भाग टिळकांच्या उपद्व्यापाचे वर्णन करण्यात खर्ची घातला आहे. माझ्या खटल्या- करिता मला जो पुरावा गोळा करावा लागला तो रौलट कमिटीला फारच उप- योगी पडला. तो पुरावा गोळा करण्याकरिता मला सुमारे २००० पौंड खर्च आला. पुराव्याच्या त्या मोठ्या दोन पुस्तकात टिळकांच्या वीस पंचवीस वर्षांच्या क्रांतिकारक चळवळीचा इतिहास नमूद झालेला आहे. वाईट इतकेच वाटते की टिळकाना काळे पाण्यावर पाठविल्यावरहि ती चळवळ थांबली नाही. पुराव्याची ही दोन मोठी पुस्तके आता मी ब्रिटिश पार्लमेंटच्या ग्रंथालयाला नजर करणार आहे. कारण हिंदुस्थानात मुद्रणस्वातंत्र्य किती बोकाळले आहे हे त्यावरून पार्लमेंटच्या सभासदाना सहज कळून येईल. माँटेग्यू-चेम्सफर्ड-सुधारणानी नेमस्त व मवाळ लोकाना जहालापासून वेगळे करण्यात यश संपादिले आहे. तरी पण अजून राष्ट्रीय सभेसारखी सभा ठराव करतेच की, शांतता परिषदेकडे हिंदुस्थानाने एक शिष्टमंडळ पाठवावे व त्यात टिळक हेही एक असावेत! पण या खटल्या- वरून तरी सरकार अजून सावध होईल अशी मला आशा वाटते. या शेव- टल्या उद्गारावरून चिरोल साहेबांच्या मनात काय जळत होते याची अतज्ज्ञ माण साला कल्पना येणार नाही. पण खरी गोष्ट अशी होती की माँटेग्यू साहेबानी टिळकांची भेट घेतली आणि शिष्टमंडळाबरोबर त्याना आपणापुढे येऊ दिले याबद्दल चिरोलसाहेब व त्यांच्या विचाराचे इतर अनेक साहेबलोक मनातून नाराज झाले होते. सरकार टिळकाना एकीकडे आपला शत्रू असे प्रसिद्धपणे म्हणते काय ! व दुसरीकडे स्वतः स्टेटसेक्रेटरी टिळकांची भेट घेतात काय व त्यांच्याशी स्वराज्याची वाटाघाट करतात काय ! कोण ही असंगति ! पण माँटेग्यू साहेब ज्या हेतूने हिंदुस्थानात आले होते त्याच्या दृष्टीने त्याना मुलाखतीतून कोणत्याही राज- कीय पक्षाला वगळता येत नव्हते. शिवाय व्यक्तिशः टिळकांची योग्यता व महत्त्व टि० उ... २४