पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० लो० टिळकांचे चरित्र भाग 8 रँडच्या खुनात प्रत्यक्ष टिळकांचा हात होता असे चिरोल यानी म्हटले नाही. का ? तर त्याना तसे उघड म्हणताच आले नाही ! पण त्यानी म्हटले आहे ते अशा झोकात म्हटले आहे की टिळकांचा रँडच्या खुनाशी संबंध खात्रीने असावा. तो सिद्ध झाला नाही ही गोष्ट निराळी ! निशाणी ३९३-१९०८ साली टिळकांच्या हातचे खटल्यात दाखल झालेले स्फोटक द्रव्याची यादी लिहिलेले पोष्ट कार्ड. पण १९०८ साली न्या. दावर यानीच त्याबद्दल टिळकांचा खुलासा मान्य करून या कार्डाला तुम्ही मुळीच महत्त्व देऊ नका असे ज्यूरीस सांगितले होते. निशाणी ३९७ - नाशीक केसमध्ये ३८ आरोपीवर झालेले जजमेंट. नाशी- कच्या खटल्याशी टिळकांचा संबंध नव्हताच. पण ३८ आरोपींपैकी विष्णु महादेव भट याना पुढे टिळकानी केसरी ऑफिसमध्ये ठेवले इतकाच टिळकांचा या निशाणीशी संबंध, भट यांचे बद्दल टिळकानी कॉर्सन यास बिनतोड उत्तर दिलेले खटल्याच्या हकीगतीत आले आहेच. ( १७ ) चिरोल साहेबांची मुलाखत चिरोल खटल्याचा निकाल लागताच टिळकांच्या अनेक शत्रूनी चिरोल साहेबाना अभिनंदनाचे संदेश पाठविले. कित्येक वर्तमानपत्रानी आपले बातमी- दार पाठवून त्यांच्या मुलाखती घेतल्या. पैकी ऑब्झर्वर ( observer ) पत्राच्या बातमीदाराला चिरोलसाहेबानी मुलाखत देताना जे उद्गार प्रगट केले ते नमुने- दार होते म्हणून त्यातील काही खाली देतो. " खटला जिंकल्याबद्दल मला अर्थातच फार समाधान वाटत आहे. खटला चालणार विलायतेत व त्याचा सर्व पुरावा गोळा करावयाचा हिंदुस्थानात या अडचणीमुळे मला सतत चार वर्षे खर्च सोसावा लागला व श्रम पडले. युद्ध चालू असल्यामुळे टपाल व तारखाते यांचे काम दिरंगाईने चालू होते म्हणून साधी गोष्टही निकालात काढण्याला चार चार महिने लागत. मी वर्तमानपत्रात लिहिण्याचा धंदा आज किती तरी वर्षे करीत आहे. या अवधीत मला अडवून खडसावून जाब विचारणारे दोनच धीट गृहस्थ आढळले. पैकी एक टिळक आणि दुसरे जर्मन बादशहा कैंसर विलियम ही दोन नावे मी एका वाक्यात उच्चारतो याचे कित्येकाना मोठे आश्चर्य वाटेल, पण खरोखरच ती दोन नावे एकत्र उच्चार- ण्याला योग्य आहेत. १९१० साली माझ्या नव्या ग्रंथाची साधने जुळविण्याकरिता मी हिंदुस्थानात गेलो. त्यावेळी मला हे पूर्ण कळून चुकले होते की, जर्मन वाद- शहाच्या महत्त्वाकांक्षेमुळे पुढेमागे लवकरच त्याचे ब्रिटिश साम्राज्याशी युद्ध जुंपणार. आणि ही की, हिंदुस्थानातील क्रांतिकारक चळवळीचे जे संशोधन मी केले त्यात मला असे आढळून आले की, हिंदुस्थानातील जहाल वर्तमानपत्रातून असा एकसा- रखा ध्वनि निघत होता की, इंग्लंडचे व कोणातरी एका मोठ्या युरोपियन राष्ट्राचे युद्ध