पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ साक्षीपुराव्याचे पृथक्करण ९९ "यावर गणू गोंधळून म्हणाला 'मला तसे काहीच सांगता येत नाही. ' “नाशीकडून औरंगाबादला परत गेल्यानंतर तीन चार दिवसानी मी दाजीला पत्र लिहिले. त्यांत कळविले की 'एकट्याने खून करण्यास माझी तयारी आहे पण जॅकसनूचा खून व्हावा अशी माझी इच्छा नाही. दुसऱ्या कोणाला मारण्याचे काम सांगत असल्यास माझी तयारी आहे. हे पत्र गणूला दाखवू नये.' या पत्राला मला नाशीकडून ताबडतोब उत्तर मिळाले की 'ठीक आहे' तुझ्या इच्छे- प्रमाणे आम्ही करावयास तयार आहों. ' मला आतां दाखविले ते हेच पत्त्र होय. प्र० - जॅकसनची अगर त्याच्या जुलुमाची तुला काय माहिती आहे ? उ०- मला स्वतःला काहीच माहिती नाही. प्र० - कर्वे याने तुला सांगितले म्हणून वाटेल तो बरा वाईट साहेब मार- ण्यास तू तयार होशील ? उ०- - होय. कारण कर्वे याजवर माझा विश्वास आहे. निदान कर्वे हा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. प्र०—साहेब लोकाना मारण्याची कल्पना तुझ्या डोक्यात प्रथम कशी आली ? उ० – आमच्या लोकाना साहेबापासून न्याय मिळत नाही असे मला दिसून आले. जुलुमाची पुष्कळ उदाहरणे मी 'केसरी' ' राष्ट्रमत' 'काळ' वगैरे इतर वर्तमानपत्रातून वाचली आहेत. साहेब लोकाना मारूनच आम्हास न्याय मिळेल असे मला वाटते. मला स्वतःला अगर जवळच्या कोणास अन्याय झाला नाही. मे. जॅकसन याना मारल्याबद्दल मला आता वाईट वाटते. एका चांगल्या माणसाला मी विनाकारण मारिले. " निशाणी ३८७ - टिळकाना १८९७ साली राजद्रोहाबद्दल शिक्षा झाल्याचा दाखला. आपणास शिक्षा झाली हे टिळकाना अमान्य नव्हते. पण ही निशाणी ग्राह्य मानली तरी रँडच्या खुनाशी टिळकांच्या लेखांचा संबंध असल्याबद्दलचे चिरोल यांचे अनुमान चूक होते. कारण १८९७ सालच्या खटल्यात सरकारी अॅडव्होकेट जनरल व खुद्द न्यायाधीश यानीहि असे स्पष्ट म्हटले होते की टिळ- कांचा व लेखांचा व खुनाचा संबंध होता असे आम्ही अप्रत्यक्ष रीतीनेहि ध्वनित करू इच्छित नाही ! आता दामोदर हरी चाफेकर याची जबानी पाहू. " टिळकांची वर्तमानपत्रे वाचून माझे मन खुनाला प्रवृत्त झाले " असे दामोदर याने आपल्या जबानीत कबूल केले असे विधान चिरोल यानी आपल्या पुस्तकात लिहिले म्हणून टिळकानी दामोदर याची जबानीच दाखल केली ! त्यात असे वाक्य कोठेच नाही. म्हणून चिरोल याना आपली कैफियत दुरुस्त करावी लागली. " लोकांच्या हिताकरिता मी रँड याला मारले " अशी चिरोल यानी दुरुस्ती केली. प्रत्येक अराजकाला असेच वाटते व तसे चाफेकर यासहि वाटत असेल. पण या जबानीने टिळकांचा संबंध काहीच सिद्ध होत नाही.