पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ ज्याने त्याने गुप्तपणाने करावयाचे असते. आपला कार्यभाग होताच या जगातून आत्महत्या करून क्रांतिकारकाने नाहीसे व्हावयास पाहिजे ! " ही जवानी देखील वर सांगितल्या प्रकारची आहे. या जवानीत त्याने टिळ- काना मोकळे करून इतर कित्येक सद्गृहस्थांची नावे घेतली ! यामुळे टिळका- पुरती ही जबानी चिरोल खटल्यात टिळकाना अनुकूल व चिरोलना प्रतिकूल होती. तथापि या जवान्या म्हणजे त्या क्षणी चौकशीवर असलेल्या पोलिस अंमल- दारांच्या मनाचे ते प्रतिबिंब असे. जवानी देणार हा मेणाचा गोळा. खरा चित्र- कार जबानी पढविणारा पोलिस ! लिमये याची जवानी घेणाऱ्या अधिकान्याची कित्येक व्यक्तीवर विशेष अवकृपा असावी असे उघड दिसते ! निशाणी ३७० - विजापूरकर जोशीराव वामन मल्हार जोशी यांच्यावर विश्ववृत्त मासिकात एक लेख प्रसिद्ध केला त्या खटल्यातील जजमेंट. आरोप राजद्रोहाचा असून लेखाने कोल्हापूरचे महाराजांचा खून करावा असे ध्वनित केले होते असा होता. वास्तविक "वैदिक मंत्रांचे सामर्थ्य " हा लेख कडक असला तरी महाराजांच्या खुनाची चिथावणी करण्याचा आरोप ओढून ताणून त्याला आणून चिकटविला होता. पण या निशाणीचा टिळकाशी संबंध इतकाच की एका ग्रुप फोटोमध्ये टिळक व विजापूरकर हे होते ! निशाणी ३८४ - अनंत कान्हेरे याची जवानी. वास्तविक ही जबानी पुरा- व्यात गैरलागू होती. कारण टिळक १९०८ साली तुरुंगात गेले व जॅक्सनचा खून १९०९ साली झाला. दुसरे असे की ही जबानी पुराव्यात ग्राह्य धरण्याला टिळक कान्हेरे यासमोर हजर असता त्याने ती दिली असती तरच ती टिळका- विरुद्ध कायद्याने मानली असती. कान्हेरे याची जबानी विस्तृत असल्यामुळे समग्र देता येत नाही. पण सावरकरांचे मॅझिनीचे चरित्र वाचून माझे मन तयार झाले असे त्याने स्वच्छ म्हटले आहे. 'जुलुमाची पुष्कळ उदाहरणे मी वाचली' असे सांगताना जरी त्याने केसरीचे नाव घेतले असले तरी काळ व राष्ट्रमत यांचीही नावे त्याबरोबरच त्याने घेतली आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे, अनंत कान्हेरे याच्या साक्षीतील काही भाग येथे देत आहो. तो असा - ८८ ८ गणूच्या खोलीत गेल्यावर मी त्यास विचारिले की जॅकसन् दयाळू माणूस आहे असे सर्व म्हणतात. यावर तो म्हणाला आमच्यातील मुख्य व्यक्ती येथे नाही. सर्वजण त्याच्या पश्चात काम करीत असतात. तुला वाटल्यास मदतनीस माग. परंतु आमच्यातील कोणीहि हे काम करावयास तयार नाही म्हणून तुला मदतनीस मिळेल की नाही याची शंका आहे.' मी गणूला म्हणालो 'तुम्ही विनाकारण जॅकसन्‌ला का मारिता १ टिळकाना शिक्षा दिली त्या दावरला का मारीत नाही ? मला तुम्ही पाठवा म्हणजे मी त्याच्या मुलाला ठार मारून येतो. दावरला मुलाच्या मृत्यूचे दुःख झाले म्हणजे टिळकांच्या हद्द पारीने लोक किती हळहळत असतील याची त्याला कल्पना येईल. '