पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ साक्षीपुराव्याचे पृथक्करण ९७ चोरीच्या आरोपावरून पकडला गेला. तेव्हा मी पुण्यास गेलो. तेथे कुलकर्णी भेटले. नेपाळ येथे संस्थानच्या दिवाणाच्या मदतीने क्रांतिकारक चळवळी संबं धाने काय काय चालले आहे ते त्यानी मला सांगितले. परदेशात विद्यार्थी पाठ- वावे व जर्मनीतून इकडे दारूगोळा बंदुका आणाव्या अशी काही खटपट चालली होती. पुढे दामू दोषमुक्त होऊन सुटला. पुण्यास त्याची माझी गांठ पडली. त्यात त्याने सांगितले की गणपतराव मोडकाने मला (दामूला ) सांगितल्यावरून कर्नल फेरिस यास मारावयाचे ठरविले. तू ही गोष्ट करू नये म्हणून मी त्यास निक्षून सांगितले. पण त्याने सांगितले मी मोडकाला वचन दिले आहे. " यानंतर नाशीकला मी नोकरीस लागलो असता सावरकर बंधूंची ओळख होऊन त्यांच्या गुप्त संस्थेचा मी सभासद झालो. त्यांच्या देशभक्तीबद्दल माझी बोलण्याची इच्छा नाही. पण त्या एकेकात बढाईखोरीच फार ! बाष्कळपणाने हवी तेवढी त्यानी बडबड करावी पण स्वतः एकहि गोष्ट करावयास ते तयार नव्हते. बाबा सावरकर नेहेमी मॅझिनी व इटली यासंबंधाने वोलत असे. पण मी म्हणे इटलीला समुद्राने परदेशांतून हत्यारे आणता आली. हिंदुस्थानला इंग्रज दर्याचे बादशहा असता हे शक्य नाही. १८५७ सालाप्रमाणे बंड करावे असा सावरकर दातार वगैरेंचा बेत होता. व शिवराम महादेव परांजपे यांची त्याला संमति होती. पण टिळकाना यांचे मार्ग मुळीच पसंत नव्हते व त्यानी असे बजावले की अशा अविचारानी देशाला तुम्ही संकटात आणाल ! अजून बंडाची वेळ आलेली नाही. सावरकराला टिळकांचा उपदेश पटला नाही व त्याने परां जप्यांच्या मार्गांचीच स्तुति केली ! ८८ १९०८ च्या मे मध्ये मी नाशीकडून मुंबईस गेलो. तेथे माझी व दामूची गांठ पडली. मी त्यास विचारले 'कर्नल फेरीस यास अद्याप का मारले नाही ? ' तो म्हणाला प्रयत्न केला पण तो फसला. अफगाणिस्थानचे अमीराकडून खाडिलकराना गुप्त बातमी कळली होती (!) तीहि त्याने मला सांगितली ! अफ- गाणिस्थानचा अमीर हिंदुस्थानवर स्वारी करण्याच्या विचारात आहे अशा वेळीं तुम्ही खून करून हिंदुस्थानांतहि अस्वस्थता आहे असे त्याच्या नजरेस आणून दिले पाहिजे असे खाडिलकरांच्या बोलण्यात आले ! " नाशीकच्या मंडळीचा कोल्हापूरच्या महाराजावरहि कटाक्ष होता व महा- राजानी गंगाधरराव देशपांडे यांचे घरी स्फोटक द्रव्यांचे काही साहित्य व वाङ्मय वाममार्गाने टाकून त्याना अडकविण्याचाहि यत्न केला होता. जॅक्सन याचा खून करावयाचे ठरल्यावर भट यानी खून करू नका म्हणून विरोध केला इत- रानी ते ऐकिले नाही. असो. हिंदुस्थानात खऱ्या हाडाचे अराजकच नाहीत. क्रांतिकारक जहाल भाषणे करणारात ढोंगीपणा मात्र हवा तेवढा भरला आहे. देशात बंडाची खरी तयारी नसताना कृपा करून त्यानी तरुणाना या मार्गाला प्रवृत्त तरी करू नये. संस्था काढून क्रांतिकारक लोक म. म. द. वा. पतिदीत नसतात. हे कार्य पंथ संग्रह