पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ लचच्या सभासदांचा व टिळकांचा असा खास एकल फोटो दाखविता आला असता तरीहि एकत्र फोटो काढलेला होता एवढीच गोष्ट त्याने फार तर सिद्ध झाली असती. लोकानी दरवडे घालण्याला टिळकांची सहानुभूति होती याचा प्रत्यक्ष पुरावा चिरोल साहेबाना काडीइतकाहि मिळाला नाही व त्याना तो देता येणे शक्य नव्हते. श्रीमंत व धनिक लोकांवर दरवडे घालून व चोऱ्यामाऱ्या करून पैसे जमा करावयाचे असा उद्योग कोल्हापूरच्या शिवाजी क्लबच्या काही मंडळीत व नाशीकच्या मित्रमेळ्यात चालू असला तरी व दामू जोशी त्यात सामील असला तरी त्याच्या अनेक साथीदार क्रांतिकारकानाहि ही गोष्ट मान्य नव्हती ! व त्याचा ते निषेध करीत, कारण क्रांतिकारक वेगळा व दरोडेखोर वेगळा. मग टिळका- सारख्या लोकास ती कशी मान्य झाली असती? या लोकांचे हे वाममार्गाचे उद्योग कर्णोपकर्णी टिळकांच्या कानावर येत असतील. पण त्यांच्यासमोर ही गोष्ट कोणी बोलता तर त्यानी ती ऐकूनहि घेतली नसती इतकेच नव्हे तर ती बोलणाराला आपल्या समोरून हाकून लावले असते ! कृष्णाजी दामोदर लिमये हा मनुष्य कोल्हापूरच्या शिवाजी क्लबापैकी असून जळजळीत क्रांतिकारक होता. त्याचे जवानीमध्ये टिळकांचा उल्लेख आला आहे व त्यावरून इतर जहाल उपदेशक व क्रांतीवाले लोक यांच्यात व टिळकांच्या उपदेशात काडीचेहि साम्य कसे नव्हते हे दिसून येते. तो उतारा असाः- " मी दामू जोशी यास ओळखतो. आम्ही शिवाजी क्लबमध्ये भेटत असू. १९०४ -५ साली झालेले रुसोजपानी युद्ध आम्ही मोठ्या उत्कंठेने वाचीत होतो. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकरिता असाच प्रयत्न व्हावा अशी आमची दोघां- चीहि इच्छा असल्याकारणाने आमची दाट मैत्री झाली. पुढल्या वर्षी क्रांतिकारक कामाकरिता पैसे जमविण्याचे हेतूने दामू व त्याचे काही मित्र यानी चोऱ्या व घरफोडी केल्या, अशा कामी श्रीमंत लोक सुखासुखी पैसे देणार नाहीत तर त्याना लुबाडले पाहिजे अशी त्याची कल्पना होती. ते म्हणत शिवाजीने हे लुटालूट केली. पण शिवाजी स्वदेशबांधवावर हात टाकीत नसे हे त्यांच्या कधी लक्षात आले नाही ! शिवाजी क्लबात आमचे वादविवाद होत. केसरी काळ व राष्ट्रमत ही जहालपक्षाची पत्रे आम्ही वाचीत असू. क्रांतिकारक चळवळीवरच माझा विश्वास आहे. तथापि देशात खरे बंडवाले कोणीच नाहीत असे मला वाटते ! हत्यारे वगैरे जमा करण्याला पैसे लागतात हे खरे. तथापि चोऱ्या करून आपल्याच देश- बांधवाना लुबाडण्याच्या मी सर्वस्वी विरुद्ध होतो. દ્ર दामू प्रथम १८९९ साली फरारी झाली. इकडे त्याचे साथीदार कोल्हा- पुरात पकडले गेले. दामू गेला तो नेपाळात कुळकर्णी यांजकडे जाऊन राहिला व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे बरोबर परत आला. खाडिलकर यांचे दामू- वर बरेच वजन असे व तोहि खाडिलकराना चहात असे. दामू १९०६ मध्ये