पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ साक्षीपुराव्याचे पृथक्करण ९५ कोल्हापूरच्या खटल्यांचे निवाडे व क्रांतिकारकांची रसभरित वर्णने ज्यूरीपुढे मांडून ज्यूरीने टिळकाविरुद्ध निकाल देणे हा वस्तुस्थितीचा विपर्यासच नव्हे तर अनर्थ होय ! टिळकांच्या घरी बाँब सापडल्याची गोष्ट कदाचित सरकारास शाबीत करता आली नसेल. पण " आखाडे स्थापण करण्यास त्यानी उत्तेजन दिले. बंडवाल्या लोकाना या आखाड्यातून शारीरिक शिक्षण देऊन त्यांच्याकडून चोया व दरवडे घालावयाचे व स्वराज्याच्या चळवळीला पैसे जमा करावयाचे असा टिळकांचा हेतू होता" असा चिरोलसाहेबांचा आरोप होता. व याला पुरावा दाखल केला तो काय तर केसरी मराठ्याचे उतारे ! कधी एके काळी एका तालीमशाळेत टिळकांचे हस्ते बक्षीससमारंभ झाला होता व त्याची हकीकत केसरीत आली होती. पण हे आखाडे टिळकानी स्थापन केले होते व दरवडे घालण्याचा त्यांचा उद्देश होता है त्याने सिद्ध कसे होणार ? कोल्हापूरचा शिवाजी क्लब व नाशिकचा मिलमेळा या गुप्त संस्थातून दरवडे घालण्याचे प्रयत्न होत असत असे मानले तरी या दोन्ही संस्थाशी टिळकांचा काडीइतकाहि संबंध नव्हता. शिवाजी क्लबला तर त्यानी कधी भेटहि दिली नाही. आणि नाशिकच्या मित्रमेळ्याने त्याना गणपती उत्सवात पानसुपारीस बोलावले असताना अत्याचारी धोरणापासून परावृत्त होण्याबद्दल त्यानी निक्षून सांगितले होते. उदाहरणार्थ ता. २४ ऑगष्ट १९०६ मधील नाशिकच्या हकीगतीसंबंधी हिंदुपंचातील उताराच टिळकानी पुराव्यात दाखल केला होता तो असा:-" शनवारी दुपारी टिळकांची व मित्रमेळ्याच्या पोरकटपणे वागणाऱ्या पुढाऱ्यांची सुमारे तास दोन तास खाजगी गुप्त मुलाखत झाली. मित्रमेळ्याची पद्ये त्यानी दिलेले मानपत्र वगैरे सर्वच दीडशहाणेपणाचा प्रकार असल्याने मी त्या संबंधी काहीच लिहू इच्छित नाही. ही बेफाम तरुण मुले केव्हा तरी मानेला गळफास लाऊन घेतील आणि नाशिकच्या पुढान्याना मान खाली घालण्याचा प्रसंग येईल अशी माझी त्यांचे वर्तणुकीवरून बालंबाल खात्री झालो आहे. टिळकानी त्यांचे वर्तन व आत्यंतिक निष्ठा यांची भाषणात स्तुती केली. परंतु त्याच भाषणात सदर तरुणांच्या वाह्यात वर्तनाबद्दल त्यांची खरपूस हजेरी घेतली. या गुप्त मुलाखतीत जे अंजन मिळाले त्याने तरी मित्रमेळ्याचे डोळे उघडतील तर बरे होईल !” शिवाजी बापैकी घरफोडीबद्दल ज्याना शिक्षा झाली होती अशा लोकांचा व टिळकांचा एकत्र काढलेला फोटो चिरोलतर्फे पुराव्यात दाखल करण्यात आला होता. पण शिवाजी क्लबात टिळक गेले असताना मुळी हा फोटो घेतलेलाच नव्हता. १९०५ साली ताई महाराज केस निमित्त टिळक कोल्हापुरला गेले होते. तेथे गोडबोले काँट्रक्टर या सद्गृहस्थाचे घरी पानसुपारी निमित्त ते गेले असता तेथे जमलेल्या सर्व मंडळीचा ग्रुप फोटो काढण्यात आला. यात अनेक मंडळी अशीहि होती की त्यांचे तोंड देखील टिळकानी कधी पाहिले नसेल. शिवाजी