पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ म्हणून त्याचा दामूचे हातून परस्पर खून करविण्याकरिता ! ! १९२७ च्या या नव्या खटल्यात दामु जवानी देताना म्हणतो:- " संध्याकाळी सुमारे ५-५॥ वाजता युरोपियन ड्रेस केलेला एक इसम अर्धा एक तास मजबरोबर इंग्लिश लोकांची स्तुति करीत होता. परंतु मी त्याला काही बोललो नाही. रात्री एका लहानशा कोठडीत मला कोंडून ठेवले व दोन शिपाई व फासेपारधी माझ्या पहान्यावर ठेवले. सकाळी उजाडल्यानंतर ७ वाजता कुर णाजवळ एक शेड बांधली आहे तेथे मला नेले. ९ वाजण्याच्या सुमारास पागे एकटे आले व शिपायास काढून टाकले. माझ्यावर खोटेनाटे आरोप घेतले होते त्याबद्दल कळकळीचे भाषण त्यानी केले. झाली ती गोष्ट झाली. आता सुटावयाची संधि आली आहे. आता जर महाराजांचे काम करशील तर तुला मी सोडण्याची तज- बीज करतो असे म्हणाले. मी म्हणालो माझ्याकडून होण्यासारखे असल्यास सांगा. ते मी करीन. ते म्हणाले, कर्नल वुडहाऊससाहेब महाराजाविरुद्ध वर लिहीत असतात च आम्ही जे करू त्याला व्यत्यय आणतात तर त्यांचा काटा काढावयाचा आहे. ज्याप्रमाणे जाधवराव वगैरे लोकाना हाकून लावता येते त्याप्रमाणे या लोकाना हाकून लावता येत नाही. कारण हे ब्रिटिश गव्हर्मेंटचे नोकर आहेत. म्हणून यांचा कायमचा काटा काढावयाचा आहे. तर तू हे काम कर म्हणून त्यानी सांगितले. त्यावेळी मी पुष्कळ आढेवेढे घेतले. त्याना सांगितले की पोरकटपणा करून किंवा खोटेनाटे आरोप ठेवून २० वर्षांची शिक्षा दिली आणि जर मी खून केला तर फाशी द्या म्हणजे झाले. त्यावेळेस त्यानी फरन्यांडीसचे उदाहरण देऊन मला सांगितले की कर्नल रेसाहेब पोलिटिकल एजेंट यांना फरन्यांडीसनी विष घातले होते. त्या बाबतीत त्याना आरोपी करून त्यांच्यावर केसही चालली होती. परंतु त्याना महाराज सरकारचा पाठिंबा असल्याकारणाने त्याना सोडून देऊन हल्ली पोलिस सुपरिंटेंडेंट बनविले आहे. हे पहा ज्या बाजूला महाराज व आम्ही आहो त्या बाजूला तुला भिण्याचे काही कारण नाही. याउप्पर तूं जर न ऐकशील तर मराठी राज्य आहे व ज्याप्रमाणे अबूबकर व काका मास्तर यांची दोघांची प्रेते बाहेर काढली त्याप्रमाणे तुझेहि प्रेत बाहेर काढू हे लक्षात ठेव. संस्थानमध्ये आम्ही काहीही केले तरी आमचे कोण काय करणार! त्यानंतर मला सोडा मी ही गोष्ट करीन असे त्याना कबूल केले. त्यावेळेस ते म्हणाले असे जर तुला सोडले तर महाराज सरकारवर दोष येईल. तर असे आम्ही तुला सोडत नाही. तुला पळून जाण्याची तजवीज करून देऊ." पुढे तो पळून गेलाहि ! तात्पर्य दामूच्या निरनिराळ्या जबान्या म्हणजे ' परब्रह्म' आहे ! त्यात खरे खोटे काय व कसे निवडावे ? दामूच्या जबानीवरून टिळकांचा कोल्हापूरच्या शिवाजी- लत्राशी व पर्यायाने खुनाशी संबंध जोडावयाचा तर दामूच्या दुसऱ्या जबानीवरून खुद्द कोल्हापूरच्या महाराजांवरच अशा प्रकारचा आरोप करावा लागेल. या जबान्यातील हकीगती जर सरकारने टिळकाविरुद्ध ग्राह्य मानल्या नाहीत तर