पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ साक्षीपुराव्याचे पृथक्करण ९३ जावो अगर काही होवो. आता जास्त लिहीत नाही. भेटीअंती समक्ष जास्त खुलासा करीन. मी वरती लोकांची नावे लिहिली आहेत त्यांचेवर व इतरहि लोकावर खोटे खटले करणार आहेत. दहशत बसवावी हाच हेतू आहे. माझ्या खेरीज इतरहि काही लोकास खोटी साक्ष देवविण्याची खटपट चालू आहे म्हणून आगाऊ कळविले आहे. " या पत्रावरून दामूने पूर्वी सांगितलेली जवानी दिली ती पोलिसाच्या जाचा- वरून व पोलिसाने सांगितली तशी दिली असे उघड ठरते. दामूच्या जबानीत खरे खोटे काय निवडावयाचे हा न्यायाधीशासहि मोठा प्रश्नच पडला असेल. अखेर दामूच्या इतर साथीदारांच्या खटल्यात दामु याच्या कृत्याबद्दल जो प्रत्यक्ष पुरावा पुढे आला तेवढा ग्राह्य ठरून दामू जोशी याची तुरुंगात रवानगी झाली. नागपूरकर व मोडक यांचेवरहि फेरिससाहेबांच्या खुनाचा कट केल्याचा आरोप होऊन खटला झाला होता. त्याच्या जजमेंटमध्ये न्यायमूर्ति क्लेमंट्स यानी दामु जोशी याचे शब्दचित्र काढले आहे. ते म्हणतात " या खटल्यात दामू हा प्रत्यक्ष आरोपी म्हणून येथे हजर नसला तरी या कटातील मध्यवर्ति व मुख्य व्यक्ति तोच आहे. दामू हा तरुण असून पहिलवान आहे. त्याचे शील अगर बुद्धि ही दोन्हीही सामान्यच आहेत. तो वाटेल तितका बेसुमार व अविचारी मात्र आहे. त्याला व्यक्तिशः स्वतःची म्हणून काही बुद्धि अगर निश्चय नाही. दुसन्याच्या बुद्धीच्या तावडीत सापडून त्याने दुसऱ्याचे हातातील शस्त्र मात्र व्हावे. तो बोलभाट असून पोलिससमोर देखील आपल्या शूरपणाची कृत्ये मोठी रंगवून फुशारकीने सांगत असतो. " दामू जोशी याची जबानी वाचूनहि वाच- काचा वरीलप्रमाणेच ग्रह होतो. आणि अशी खात्री होते की या माणसाला महा- राष्ट्रीय पुढाऱ्यानी आपल्या विश्वासात घ्यावा इतके काही ते सर्वच मूर्ख नव्हते ! आमच्याकडील फौजदारी जबान्या घेण्याची पद्धत म्हणजे अशी की पोलिस अधिकाऱ्याने नुसते सूतोवाच म्हणावयाचे आणि नंतर आरोपीच्या तोंडून महा- भारताएवढे भारुड वदवावयाचे ! कार्सनसाहेब या सर्व जबान्या वाचून दाखवीत असता सायमन साहेब आश्चर्याने म्हणाले " तुमच्या हिंदुस्थानात चालते तरी काय ? एक जबानी काढावी तर त्यात हवे ते येते ! 35 असो. शिक्षा झाल्यावर एक दोन वर्षानी दामू हा तुरुंगातून नाहीसा झाला ! • कोणी म्हणत तो फरारी झाला कोणी म्हणत कोल्हापूरच्या महाराजानी गुप्तपणाने त्याला जगातून नाहीसा केला. पण अखेर पुनः पंधरा वर्षानी त्याचा तपास लागून १९२७ साली त्यास पकडून कोल्हापूरास नेले. या खटल्यातहि त्याने फिरून जबानी दिली! ती पूर्वीपेक्षाहि आश्चर्यजनक आहे ! त्यात त्याने असे सांगि- तले की "पागे व फरनॅडिस या पोलिस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने प्रत्यक्ष शाहु महाराजानीच मला पळून जाण्यास संधि दिली ! " आणि ती कशाकरिता ? तर छत्रपति महाराजांविरुद्ध कर्नल बुडहाऊस हा सरकारकडे लिहून कळवीत होता