पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० लो० टिळकांचे चरित्र भाग १ कबजात घेतील या म्हणण्यात काही हशील नाही. कॉंग्रेस राष्ट्रीय आहे. ती टिळकांची नव्हे किंवा गोखल्यांचीहि नव्हे. काँग्रेसचे धोरण काय असावे हे काँग्रेसने ठरवावयाचे आहे. अमुक एका व्यक्तीने नाही. " यातील 'ओंकारेश्वरा- वर गोवन्या गेल्या' हे शब्द टिळकानी जे लिहिले ते गोखले यांच्या समीप आलेल्या मृत्यूला उद्देशून लिहिले असे काहींचे म्हणणे. काहीचे म्हणणे त्या शब्दां- बरून गोखले मरावे अशी टिळकाची इच्छा असल्याचे ध्वनित होते. आणि काहीचे म्हणणे टिळकांच्या मनात यापैकी काही नसले तरी ते विषारी शब्द गोखल्यांच्या जिव्हारी लागले म्हणून त्यांचे आयुष्य आणखी काही काळ लांबाव- याचे ते न लांबता ते शब्द मनाला लावून घेतल्यामुळे गोखले वारले. पण हे सर्व बोलणे वायकीथाटाचे असे आम्ही समजतो. आणि त्यात गोखल्यांच्या मृत्यूच्या हळहळीपेक्षां टिळकांच्या द्वेषाचेच प्रतिबिंब अधिक दिसते. टिळकांच्या अपशब्दानी जर गोखले मरावयाचे तर ते यापूर्वी कितिदा तरी मरावयास पाहिजे होते. कारण टिळक त्याना टाकून लिहित, अपशब्द लिहित, असे जरी म्हटले तरी एकमेकाना एकमेकांची ओळख फार दिवसांची होती. गोखल्यांचे मन नाजुक असले तरी टिळकांची निंदा सोसण्याइतके ते सवयीने तरी खंबीर व ढणक झाले होते. बरे टिळकांचा वरील लेख सगळा वाचून कोणीहि सांगावे की, असा खरा जिव्हारी लागणारा एक शब्द तरी त्यात कोणता आहे ? गोवऱ्या ओंकारेश्वरी गेल्या हे टिळकानी त्यांच्या एकट्यापुरते म्हटले नव्हते. स्वतःलाहि उद्देशून ते म्हटले होते. आणि ४९ वर्षांच्या गोखल्याना ते लागतील तर अठ्ठावन वर्षाच्या टिळकाना ते अधिकच यथार्थतेने लागावेत. बोलाफुलाची गाठ किंवा काक- तालीय न्याय किंवा निव्वळ योगायोग असेच या शब्दाना उद्देशून कोणीहि समंजस मनुष्य म्हणेल. आणि खरोखर पाहिले तर टिळकांची जी त्या शब्दापुढील दोन वाक्ये आम्ही दिली आहेत ती लक्षात घेतली तर आज कोण मरणार उद्या कोण मरणार याची चिकित्सा त्याना खरी करावयाची नसून, व्यक्ति ही नश्वर आहे राष्ट्रीय सभेसारखी संस्था ही चिरकाल टिकणारी आहे इतकाच विरोध त्याना या ठिकाणी दाखवावयाचा होता. 'नदीवरच्या गोवऱ्या' टिळकानी आवेशाच्या बोल- ण्यात काढल्या पण साध्या किंवा विनोदी बोलण्यात ते शब्द कोणी वापरीत नाही असे नाही. आमच्या एका मित्राला उद्देशून दुसऱ्या एकाने सरळ मनाने असे शब्द परवा भर सभेत उच्चारले तेव्हा त्या मित्राने त्यावर अशी विनोदी टीका केली. तो म्हणाला " जिवंतपणीच माझ्या गोवऱ्या नदीवर जाऊन पडलेल्या बन्या. कारण मग आयत्या वेळी गोवन्या येण्याला उशीर लागतो. आणि नदीच्या पात्रात पाण्याच्या काठी उगीच बराच वेळ कुडकुडत बसावे लागते. त्याऐवजी शेकोटीची आधीच तयारी झालेली बरी ! " तात्पर्य टिळकांच्या लेखात ते शब्द आले म्हणून गोखले मरावे या बुद्धीने किंवा ते शब्द वाचून गोखल्यांचे मरण