पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ गोपाळराव गोखले यांचा मृत्यु १९ हमी देतील अशी त्यांची अपेक्षाहि असणे शक्य नाहीं. आणि अशी हमी द्याल तरच आम्ही समेट करू असा जर कोणाच्या म्हणण्याचा अर्थ आहे असा टिळ- कांचा समज झाला असता तर समेटाचे बोलणे त्यानी तेव्हाच धुडकावून लावले असते. गोखले हे समेट करणार होते तो एकट्या टिळकावर व्यक्तिशः उपकार करण्याकरिता नव्हे. तर एकंदरीने राष्ट्राचे व राष्ट्रीय सभेचे हित कशात आहे हे पाहूनच. . तसेच 'I have never advocated boycott of Govrnment' या तारेतील शब्दांचा अर्थ ' In my conversation with Subrao ' असे शब्द गृहीत धरूनच करावयास पाहिजे होता. कारण प्रश्न आताचा व या पुढचा इतक्यापुरताच असल्यामुळे 'मी पूर्वी केव्हा काहीच केले नाही,' असे सांगण्याच्या भानगडीत टिळक का पडतील? शिवाय " आजहि माझे स्नेही लोक म्युनिसि- पालिट्यातून लोकलबोर्डातून कायदे कौन्सिलातून काम करीत आहेत " हे सहकार - पसंतीदर्शक शब्द त्याच तारेत पुढे लिहिले होते ते जमेस का धरावयाचे नाहीत १ तात्पर्य सुबराव यांच्या बोलण्याचा काहीहि परिणाम गोखले यांच्या मनावर झाला असला तरी मेथा वाच्छा वगैरे मंडळी आपल्याला नावे ठेवतील या एक प्रका- रच्या नेतृनिष्ठेनेच त्यानी या समेटाच्या भानगडीतून पाय मागे घेतला असावा. व ता. १६ चे पत्रावरून स्वतः टिळकांचीहि अशीच कल्पना होती असे दिसते. टिळक व सुबराव यांचे हे भाषण निमित्तप्राय असावे. विजापूरकरानी प्रसिद्ध केल्याप्रमाणे सुबराव व टिळक यांच्या संभाषणात गोखल्यांचे हेतू डळमळण्या- सारखे काही विशेष होते असे म्हणवत नाही. असो या सर्व वादाची हकीकत व आपली बाजू टिळकानी ता० ९ फेब्रुवारीच्या केसरीत "चोराच्या उलट्या बोंबा " या अग्रलेखांत दिली असल्यामुळे सदर अग्रलेख जसाचा तसाच आम्ही या भागाच्या परिशिष्टांत दिला आहे. (५) गोपाळराव गोखले यांचा मृत्यु या वादामुळे बरीच मोठी खपली निघाली. पण असे वाद पूर्वीहि पुष्कळ झाले होते आणि टिळक व गोखले यांचे शब्दयुद्ध ही काही नवीन गोष्ट नव्हती. मात्र या वादानंतर लवकरच जी एक गोष्ट दुर्दैवाने घडून आली तिच्यामुळे पूर्वीच्या कोणत्याहि वादापेक्षा लोकांच्या मनात या वादाची आठवण अधिक राहिली. ही गोष्ट म्हणजे गोखले यांचा मृत्यू होय. ही दुःखकारक गोष्ट या वादा- नंतर अवघ्या एक दोन आठवड्यात घडून आली. याला अनुलक्षून कित्येकानी या मृत्यूचे खापर टिळकांच्या डोक्यावर फोडप्याचा प्रयत्न केला. कारण कर्मधर्म संयोगाने अशी गोष्ट घडली की ९ फेब्रुवारीच्या केसरीत या वादावर जो भला पाच कॉलमचा लेख टिळकानी लिहिला त्याच्या समारोपात खालील शब्द आले होते. "गोखले काय टिळक काय दोघांच्याहि गोवऱ्या आता बहुतेक ओंकारेश्वरावर गेल्या आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. टिळक काँग्रेसमध्ये आले तर ते ती