पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ कोल्हापूर सरकारने फेरिस साहेबांचा खून करण्याचा कट केल्याचा आरोप त्याच्यावर ठेऊन त्यास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठाऊन तुरुंगात डांबून टाकले. पण टिळक वगैरे इतर पांच पन्नास पुढाऱ्यांचा क्रांतिकारक कटाशी संबंध असल्याचे ठरविणारी जी जवानी त्याने दिली ती खोटी पाडण्याचे साधनह आम्हास सुदैवाने उपलब्ध झाले आहे. पोलिस पाहयत दामू जोशी यास गैर- कायदा दोन अडीच महिने ठेवण्यात आले असून खोटी जवानी देण्याबद्दल त्याचेवर नाना प्रकारचे जुलूम होत होते. अशा वेळी त्याने बेळगावजवळच्या वड- गावचा खटला चालू असता काका पाटील वकील यास एक गुप्त पत्र पाठविले ते पुढे उघडकीसहि आले. ते असे- दामू जोशी याने तुरुंगातून पाठविलेले गुप्त पत्र कोल्हापूर ता. २७ जून १९०९ " मी आज ११ महिने कच्च्या तुरुंगात आहे. त्याहूनहि अलीकडे तीन- चार महिने पोलीसचे अटकेत मॅजिस्ट्रेटचे हुकमावाचून आहे. मला अटकेत का ठेवले आहे समजत नाही. माझेवर कज्जा असलेस तो चालविता येत नाही. येथील मॅजिस्ट्रेट लोक अगर दुसरे ऑफिसर दाद घेत नाहीत. मला ब्रिटिश पोलिसचे ताब्यात ठेवले आहे. व त्यांचा सारखा त्रास सोसावा लागत आहे. हे जे पत्र धाडीत आहे त्याचे कारण येवढेच की मला पोलिसचे ताब्यातून काढ- णेची आपलेकडून काही व्यवस्था करावी. मला असे समजविण्यात आले आहे की 'तू - ( म्हणजे मी ) लो० टिळक गंगाधरराव देशपांडे गणपतराव मोडक कृष्णराव खाडिलकर हणमंतराव देशपांडे अशा बड्या लोकावर ( विरुद्ध ) साक्षी आम्ही सांगू त्याप्रमाणे दे. खोटी साक्ष देण्यास तयार जाहले पाहिजे. नाहीतर आतापर्यंत हाल केले ते काहीच नाहीत. यापुढे तुला हालहाल करून ठार मारू व जाळून अगर पुरून टाकू व पळून गेलास म्हणून हूल उठवू व घरची हि इस्टेट फरारी झालास म्हणून जप्त करून बायकापोराना भिकेला लावू. तुला जो आज- पर्यंत अटकेत ठेवला आहे त्याचे कारण तूं जरी कज्ज्यातून सुटला आहेस तरी तुझे विरुद्ध अपील केले आहे. त्यात पुष्कळ शिक्षा द्यायला लावू. तुझेवर गुन्हा शाबीत नाही तरी महाराजाना सांगू म्हणजे महाराज कोठपर्यंत तसे करीत नाही पाहू. व शिक्षा दिलेवर तुरुंगात विष घालून मारून टाकणेची व्यवस्था करू. डॉक्टर लोक आमचेच आहेत. ते आमचेबाहेर जाणार नाहीत. काही तरी रोगाने मेलास असा त्यांचा अभिप्राय घेऊ अगर निकाल न करिता असेच कुचं- बून कुचंबून मारू. नाहीतर खोटी साक्ष देणेस तयार हो. ' असे सारखे माझे पाठीस लागले आहेत. त्यांचा त्रास चुकविणेसाठी साक्ष देतो असे बोललो आहे. तेव्हा मला लौकर पोलिसचे ताब्यातून काढविण्याची व्यवस्था जाहलेस मजवरचा तो प्रसंग चुकणार आहे. मी खोटी साक्ष देत नाहीच. मग मरण येवो. तुरुंगात