पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग 8 साक्षीपुराव्याचे पृथक्करण ९१ डला ! त्याबरोबर एक विनंतिपत्रहि सापडले. या विनंतिपत्रात असे लिहिले होते की टिळकाना ६ वर्षांची शिक्षा झाल्या कारणाने सर्व लोकानी दोन महिने सुतक धरावे. तसेच दुसरेहि एक हस्तपत्रक सापडले होते. त्यात टिळकाना शिक्षा देणाऱ्या दावरचा सूड घ्या व त्याला नाहीसा करा असे लिहिले होते. टिळक मंडालेस असता झालेल्या गुन्ह्याच्या खटल्यात टिळकांचा उल्लेख आल्यावरून हा फोटो व हे पत्रक पुराव्यात दाखल झाले ! निशाणी ३६८ - दामू जोशी याचेवरील खटल्याच्या निकालाचे जजमेंट, दामू जोशी याला कर्नल फेरिस याचा खून करण्याचा कट केल्याच्या आरोपावरून पकडण्यात आले. प्रथमतः अशाच प्रकारच्या एकदोन खटल्यात तो सांपडला असता त्याचेवर दोष शात्रीत झाला नाही. त्याचा कबुलीजबाब गैरलागू व पुराव्यात अग्राह्य ठरला. आणि पिस्तुल घेऊन कर्नल फेरिस यांचे बंगाल्यावर दामू जोशी हा गेला असा पुरावा पुढे आला होता तरी ' प्रयत्न ' या शब्दाची जी कायदेशीर व्याख्या आहे त्यात जोशी याचा गुन्हा येऊ शकला नाही. त्यामुळे किंकेड साहेबानी त्यास दोषमुक्त करून सोडून दिले. दामू हा दोन अडीच महिने पोलिस पहाऱ्यात होता व त्याने दोन तीन जवान्याहि दिल्या. दिलवर व घाटगे या पोलिस अधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्याने लांबलचक जवानी दिली. त्यात 'टिळकानी एक बाँब तयार केला होता तो मी लकडी पुलाचे पाठीमागे नदीकाठी उडविला त्याचा मोठा आवाज झाला. ' असे वर्णन केले आहे ! ' महा- राष्ट्रातील पुढाऱ्याच्या सल्ल्याने बाँबचा एक मोठा कारखाना काढण्यात याव- याचा होता ! कर्झन यांचा दिल्लीदरबारचे वेळी खून करावयाचा होता. शिवराम- पंत परांजपे यांचेकडून मला पैसे मिळाले. टिळकानाहि ही खून करण्याची गोष्ट ठाऊक होती. कर्नल फेरीस याचा खून कोल्हापुरास आक्कासाहेब महाराज यांच लग्नमंडपात करावयाचा होता. ' असल्या अनेक विचित्र हकीगती या जबानीत असून महाराष्ट्रातील लहानथोर पुढाऱ्यांची व निदान शंभर दीडशे प्रसिद्ध व्यक्तींची नांवे या जबानीत दामू याने गोवली आहेत ! पण ती खरी असल्याचा यत्किंचितहि पुरावा सरकारास खरोखरीच मिळता तर सरकारने टिळकाना व इतराना काही निमित्त ठेवून फासावर चढविले असते अगर हद्दपारच केले असते ! टिळकांचे व सरकारचे हाडवैर लक्षात घेता ही गोष्ट त्यानी खात्रीने केली असती इतकेच नव्हे तर भाल्यावर टिळकांचे शिर रोवून ते राजधानीत मिरविले असते. कमी केले नसते! पण बोलक्या पढतमूर्खाला त्याचा बोलके- पणाच बाधतो त्याप्रमाणे दामू जोशी याची साक्षच त्याच्या वाचाळतेने खोटी ठरविली ! खुद किंकेडसाहेबानीच आपल्या निकालात दामू हा वाचाळ बढाई- खोर थापाड्या आहे असे म्हटले आहे. दामू जोशी याच्या साक्षीत अगर जबा- नीच्या भारुडात खऱ्या खोट्या गोष्टींची बेसुमार भेसळ असल्याकारणाने कोर्टाने त्याच्या इतर गुणावरून फक्त ती त्याच्या एकट्याच्या विरुद्ध ग्राह्य मानली. व