पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ होते. शिवाय मित्रत्वाच्या साहचर्याने एकाची गुन्हेगारी दुसऱ्यावर कशी येते? किंवा एकाच्या सर्व कृत्यास दुसन्याची संमति होती असे कसे मानता येईल? काळपत्राचेहि अनेक अंक निशाण्या म्हणून पुराव्यात दाखल होते. पण ते टिळ- कांच्या संबंधाने सर्वस्वी गैरलागू होते.

निशाणी ३३१—यात सावरकरांच्या 'मॅझिनीचे चरित्र' या पुस्तकावर काळकर्त्यांनी दिलेला अभिप्राय आहे. यात या पुस्तकाची तोंडभर स्तुति असली ब तिला ' भगवद्गीता' असेहि विशेषण दिलेले असले तरी टिळकांच्या सट- ल्याशी अगर आरोपाशी या अंकाचा काहीच संबंध नव्हता. निशाणी ३३२ - हे सावरकरांच्या मॅझिनीच्या पुस्तकातील अर्पणपत्रि- केचे दर्शनी पान होते. यात 'लोकमान्य टिळक व लोकमान्य परांजपे यास हे पुस्तक अर्पण केले आहे' असे लिहिले होते. इतकाच या पुस्तकाशी टिळकांचा संबंध! याच निशाणीत सावरकरांची ३२ पानांची प्रस्तावनाहि दाखल झाली आहे. सावरकरांचे पुस्तक हा फार तर सावरकरांच्या हेतूचा पुरावा होईल. टिळ- कांच्या हेतूचा म्हणून तो पुरावा म्हणणे गैरलागू होय. निशाणी ३४६ ० घनाप्पा सिद्धरामअप्पा वाळवे यानी प्रसिद्ध केलेले सन १९०७ मधील टिळक व परांजपे यांच्या व्याख्यानाचे पुस्तक. सदर वाळवे याना नाशिकच्या खटल्यात शिक्षा झाली होती. त्यानी टिळकांच्या व्याख्यानाचे पुस्तक छापून काढले इतकाच टिळकांच्या नावाशी त्यांचा संबंध! निशाणी ३४९ - नाशिकच्या खटल्यातील भावे या आरोपीच्या घरी झालेल्या झडतीचा पंचनामा यात लाल-बाल-पाल यांचा एकल फोटो भावे यानी ठेवला होता. इतकाच १९१० सालच्या कटाशी (टिळक त्यावेळी तुरुं गात होते) किंवा भावे यांच्याशी टिळकांचा संबंध! निशाणी ३६०-३६२-३६४ – या कोल्हापुरातील गुन्ह्यासंबंधाच्या आहेत. पैकी निशाणी ३६० पाध्ये व प्रसादे याना घरफोडीच्या आरोपाबद्दल कोर्टाने शिक्षा दिली त्या हुकमाची नक्कल (१९०६). निशाणी ३६२ – दामू जोशी प्रसादे व गुळवणी यास कोल्हापूर येथे घरफोडी व चोरी या आरोपाबद्दल शिक्षा झाली याबद्दलची कोर्टाच्या हुकमाची नक्कल, निशाणी ३६४ - शेणोलीकर अंबापकर व गोखले याना रासायनिक द्रव्ये चोरल्याबद्दल शिक्षा झाल्याची नकल. यातील पाध्ये प्रसादे हे लोक टिळ- कांचे बरोबर काढलेल्या एका फोटोत आढळले इतकाच त्यांचा संबंध! निशाणी ३६६-दामू जोशी व इतर सात आरोपी यांजवर १९०९ साली कोल्हापुरात जाहिराती चिकटवून लोकास बाँबची कृति शिकवली या आरोपा- वरून खटला झाला त्यातील हा निकाल आहे. त्यात टिळकांच्या नावाचा उल्लेख इतकाच की वडंगेकर या नावाच्या आरोपीच्या घरी टिळकांचा एक फोटो साप-