पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टंट लो० टिळकांचे चरित्र भांग ४ फौजदारी फिर्याद करता आली असती. आणि मग अशा खटल्यात सहा मिळून एकच मुद्दा झाला नसता काय? अर्थात् दोषी किंवा निर्दोषी ह्या एका शब्दाने त्या खटल्याचा निकाल झाला असता. म्हणून मी या सर्व मुद्यावर तुमचा निकाल काय असेल तो एकच मागतो. आणि पुस्तकात लिहिलेले योग्य की अयोग्य हे सर्व लक्षात घेऊन काय तो एकच निकाल द्या. तुमचा निकाल प्रतिवादीतर्फे असला तर प्रश्नच नाही. पण तुमचा निकाल बादीतर्फे असला तर नुकसान भर- पाई किती द्यावयाची हेहि तुम्ही ठरवा. समोर असल्यापैकी वाटेल ते कागदपत्र घेऊन तुम्ही पलीकडच्या दालनात जाऊन विचार करा. आणि अजूनहि माझी काही मदत पाहिजे असेल तर ती मागा मी आनंदाने देण्याला तयार आहे. " न्या. डार्लिंग यांचे हे भाषण झाल्यावर ज्यूरीतील गृहस्थ ५ वाजून ५० मिनिटानी आपल्या खोलीत गेले आणि ६ वाजून १७ मिनिटानी बाहेर आले. त्याना पहिला प्रश्न हा करण्यात आला की 'तुम्ही सर्वांनी एकमताने निकाल ठर- विला आहे काय? ' त्यावर फोरमनने उत्तर दिले. 'होय. 3 डार्लिंग—तुमचा निकाल कोणातर्फे आहे? उ० – प्रतिवादीतर्फे कार्सन – निकाल आमच्यासारखा झाला तेव्हा आमचा खर्चहि देववावा. डार्लिंग –स्पेशल ज्यूरी कोणी मागितली? कार्सन – वादीने. डार्लिंग -ठीक आहे.

6 ह्या शेवटी ज्यूरीला उद्देशून न्यायमूर्तीनी फिरून एक प्रश्न विचारला. खटल्यात चिरोलसाहेबाबरोबर मॅकमिलन कंपनी हीहि प्रतिवादी आहे. तेव्हा तुमचा निकाल त्यांच्याहि बाजूचा असे समजावयाचे काय?' त्यावर ज्यूरीने 'होय' असे उत्तर दिल्यावर खटल्याचे काम समाप्त झाले. (१६) साक्षीपुराव्याचे पृथक्करण या भागाचे आरंभी मुंबईस कमिशनपुढे झालेल्या साक्षीदारांच्या तोंडी पुराव्यापैकी निवडक भाग दिला आहेच. यापैकी काही साक्षीदार नाशिक येथील खुनाच्या खटल्यात शिक्षा झालेले होते. पण त्यापैकी एकानेहि या खुनाच्या किंवा इतर कटाशी टिळकांचा संबंध होता असे म्हटले नाही. चिरोल साहेबाना या साक्षीदारांपासून काही मिळेल अशी बरीच आशा होती, पण ती सफळ न झाल्या कारणाने त्याना निराशेनेच विलायतेला परत जावे लागले होते. तसेच मुंबईच्या कमिशनमध्ये टिळकांचे वकील दादासाहेब करंदीकर यानी वेळोवेळी हरकत घेतली असताहि अनेक जबान्या न्यायनिवाडे व खटल्याच्या हकीकती दाखल करण्यात आल्या व या सर्व निशाण्या मांडून पुराव्यात ग्राह्य मानल्या गेल्या. म्हणून त्यात ह्या खटल्याच्या दृष्टीने टिळकांचा वस्तुतः किती संबंध होता व