पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ न्या० डार्लिंग यांचा समारोप ८७ ताच उल्लेख केला व त्याची जबाबदारी फ्रेंच वर्तमानपत्रावर येत नाही असे सांगि- तले. पण क्लेमेसोच्या बाबतीत निरनिराळ्या माणसांचा त्याच्याशी खाजगी द्वेष होता असे तरी सिद्ध झाले आहे काय? उलट वर्तमानपत्रातल्या लेखावरूनच अशा गोष्टी घडतात हे दिसून आलेले आहे. ह्या खटल्यात नाशिकच्या मुलानी मॅझिनीचे चरित्र वाचल्याचे आलेच आहे. पण मॅझिनी हा चळवळ्या होता. प्रजा- सत्ताक राज्य स्थापणारा बंडखोर होता. आणि त्याने इटालीतील ऑस्ट्रियन लोकांची सत्ता उलथून पाडली. मॅझिनीला जॅकसनसाहेबांचे नाव माहिती नव्हते. पण मॅझि- नीचे पुस्तक वाचून काय विचार सुचत असतील ह्याचा विचार करा. इतके झाल्यावर आता नुकसान भरपाईच्या रकमेचा विचार! पण ह्या ठिकाणी टिळक दावर यांचा संवाद व दावर यानी टिळकाना उद्देशून केलेले शेवटचे भाषण लक्षात आणा. आणि हे तर खुद्द टिळकांच्या देशातील गृहस्थ. चंदावरकर यांचा निकाल फिरला असेल पण दावर यांचा निकाल फिरला काय? निमूटपणे सहा वर्षे टिळकाना शिक्षा सोसावी लागली. मग अशा मनुष्याला भरून देण्यासारखी अब्रू किती हे तुम्ही ठरवा. १९१४ साली लष्कर भरती होऊ नये म्हणून टिळकानी खटपट केली. आणि असले भाषण थांबवावे म्हणून सरकारने त्याना बंदी केली. आणि हे केव्हा? तर आम्ही इकडे आपले प्राण खर्ची घालीत होतो आणि पुरुषचसे काय पण बायका सुद्धा काडतुसे करण्याच्या कामावर लागल्या होत्या तेव्हा! आणि या युद्धातील इंग्लंडचा वैरी जो जर्मनी त्याच्या वस्तु वाटेल तर घ्या पण विलायती घेऊ नका असा टिळकानी उपदेश केला होता. चिरोल साहेबांच्या पुस्तकातील काही वाक्ये अशी आहेत की त्याबद्दल बेअब्रूची फिर्याद करिता येईल, पण त्या बरोबर हेहि लक्षात ठेवा की चिरोलसाहेबांच्यातर्फे त्या दोषांचा परिहार होण्या- सारखा पुरावा आला आहे. तात्पर्य बेअब्रूकारक विधाने केली आणि त्यांचा परिहार झाला नाही असे तुम्हाला अखेर बाटले तर तुम्ही वादीचा दावा देववा. आणि मग नुकसानीची रक्कम किती द्यावी हेहि तुम्ही ठरवा. मात्र सहा मुद्दे मिळून एकच मुद्दा समजा.

33 स्पेन्स – पण सायमन साहेबानी हे सहा मुद्दे एकत्र केले नव्हते. आणि करा म्हणून आपणाला विनंति केली नव्हती. डार्लिंग – पण त्यानी तसे केले नसले म्हणून काय झाले? मी सहा मुद्यांचा एकच मुद्दा समजतो. स्पेन्स – पण सहा मुद्यांचा एक मढा करू नये असा मी आपणाला अर्ज करितो. डार्लिंग—तो अर्ज मी नामंजूर करितो. टिळकानी नुकसानभरपाई मागितली. परंतु आपले नुकसान पैशाने किती झाले हे सिद्ध केले नाही. असे नुकसान शाबीत झाले तरी त्याला 'स्पेशल' असे म्हणतात. विशेष प्रकारचे नुकसान नसल्याकारणाने टिळकाना चिरोलसाहेबावर