पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ साक्षीपुराव्याचे पृथक्करण वादाचे म्हणून जे मुद्दे कोर्टाने ठरवले होते त्या दृष्टीने त्या किती गैरलागू होत्या याचे येथे थोडेसे दिग्दर्शन करण्याचे योजिले आहे. चिरोल साहेबांचा पहिला आरोप असा की टिळकानी हिंदुमुसलमानात वितुष्ट उत्पन्न करण्याकरिता गोरक्षण मंडळ्या स्थापल्या व स्थापून तसा त्यांचा ' उपयोग ' केला. पण अशी कोणतीहि संस्था टिळकानी स्थापल्याचे चिरोल साहेबाना दाखवता आले नाही. १८९३-९४ साली हिंदुस्थानात जे ठिक- ठिकाणी हिंदुमुसलमानांचे दंगे झाले त्याबद्दल सरकार व सरकारचे धोरण यावर टीका असलेले केसरीमराठ्याचे बरेच अंक पुराच्यात दाखल झाले होते. पण वर्तमानपत्रकार या दृष्टीने टीका करणे वेगळे आणि हिंदुमुसलमानामध्ये वितुष्ट आणण्याकरिता टिळकानी गोरक्षणाच्या संस्था स्थापणे वेगळे. शिवाय हिंदुस्थानातील इतर अनेक वर्तमानपत्रकर्त्यांनीहि अशीच टीका केली होती. त्याचप्रमाणे त्या वेळच्या कौंसिलच्या सभासदानी व ना. गोखले यानी सार्वजनिक सभेतर्फे सर- कारास जो अर्ज पाठवला होता त्यामध्येहि केसरी सारखेच मत प्रगट करून सरका- रास दोष दिला होता. निशाणी ३१५ हा १८९३च्या हिंदुमुसलमानांच्या दंग्याचे वेळी पोलिस कमिशनर व्हिन्सेंट यानी केलेला रिपोर्ट आहे. यात दंग्याचे कारण म्हणून त्यांनी असे मत दिले आहे की गोरक्षण संस्थामुळेच हे दंगे झाले व १६ कलमात ते असे लिहितात. "मुंबईतल्या दंग्याला विशेषतः 'गुजराथी' या वर्तमानपत्रामुळेच प्रोत्साहन मिळाले. पण या निशाणीत टिळकांचे नाव नाही व दंग्याशी टिळकांचा संबंध असल्याचा उल्लेखहि नाही. निशाणी ३१७ – गणपती उत्सवातील निरनिराळी पदे-या पदाशी टिळ- कांचा प्रत्यक्ष संबंध काहीच दाखविता आला नाही व नव्हताहि निशाणी ३१८-मुसलमानांचा सरकारास अर्ज-यात पुण्याच्या ब्राहा- णानी गणपती उत्सव सुरू करून मुसलमानांच्या मोहरमच्या उत्सवाची थट्टा आरं- भली आहे असे लिहिले आहे. फार तर हे व्यक्तिशः काही मुसलमानांचे मत म्हणता येईल. चिरोल साहेबाना हवा तसा टिळकांच्या हेतूचा पुरावा त्यात नाही. निशाणी ६ –केळकर यांचे १८९७त केलेले मराठा पत्राचे डिक्लेरेशन. यांच्या या प्रतिज्ञालेखावरूनच चिरोल यानी मराठ्याचे जे अंक दाखल केले ते 'टिळकां'चे हेतू दाखविण्याच्या दृष्टीने गैरलागू ठरतात. डिक्लेरेशन याचा अर्थ जबाबदारी घेतल्याची कबुली. व ही कबुली सरकार दरबारी दुसऱ्या एकाच्या नावाने दाखल असता ती टिळकांचीच आहे असे प्रतिपादन करणे व्यर्थ आहे. निशाणी ३२५ – काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांस राजद्रोहाच्या खटल्याबद्दल शिक्षा झाल्याची कोटीच्या हुकमाची नक्कल. शिवरामपंत परांजपे यांचा व टिळकांचा खाजगी स्नेहसंबंध असेल. पण त्यांची मते काही काही बाबतीत दोन ध्रुवाइतको एकमेकापासून लांब होतो. काळपत्राशी टिळकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काडीइतकाहि संबंध नव्हता असे त्यांनी आपल्या साक्षीतच सांगितले