पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ ८ > होती की नाही हे ठरविणे तुमचे काम आहे. एकवेळ रागाने टीका केली म्हणून ती गैर आहे असे ठरत नाही. कोणत्याहि वादाला दोन बाजू असतात. कारण असेहि होऊ शकते की अगदी कडाक्याने वाद झाला तर तिन्हाईत असेहि म्हणू शकेल हे भांडले पण दोघेहि रास्तपणाचेच बोलले. एकाच पुस्तका- वर निरनिराळ्या वर्तमानपत्रांचे अभिप्राय येतात. असे असताहि दोघाही टीकाकारानी केवळ सरळ मनाने टीका केली असे देखील असू शकेल. अर्थात पुस्तकावर कोणी अभिप्राय वाईट दिला म्हणून बेअब्रूची फिर्याद होऊ शकत नाही.. टीकाकाराचा हेतू काय होता हे पहावे लागते. एखाद्या चित्राला बरे वाईट म्हणण्याचीहि गोष्ट अशीच आहे. टीका बरोबर की चूक ह्यापेक्षा सुबुद्धीची की दुष्ट बुद्धीची हे पहावे लागते. खटल्यासंबंधाने सामान्यतः रिपोर्ट किंवा सारांश एकंदरीने बरोबर असला म्हणजे भागते. रिपोर्ट वाचून लोकांची कल्पना होईल त्याविरुद्धच कदाचित खटल्याचा निकाल होतो. पण तो रिपोर्ट छापणाराचे नशीब खटल्यातील निकालावर अवलंबून नसून त्याने दिलेली हकी- कत बरोबर होती की नाही इतकेच पाहून निकाल द्यावयाचा असतो. प्रिव्ही कौंसि- लाने टिळकाना अखेर खरे ठरविले म्हणून, चंदावरकरांच्या निकालाचा सारांश चिरोल साहेबानी जर बरोबर दिला असेल तर, त्यांच्यावर फिर्याद लागू शकत नाही. हिंदुमुसलमान यांचे संबंध लक्षात घेता जे लेख तुमच्यापुढे वाचून दाखविण्यात आले त्यावरून चिरोल साहेबाचे लिहिणे बरोबर होते की नाही ते ठरवा. टिळकानी पुस्तकातील वाक्ये उडत उडत घेतली आहेत. त्यांच्यावर दोषारोप करणारी काही वाक्ये बेअब्रूकारक नाहीत हे म्हणणे गैर नाही. असे का? तर वगळलेली कित्येक वाक्येहि आक्षेप घेतलेल्या कित्येक वाक्यापेक्षा अधिक बोचणारी आहेत. विद्यार्थ्यासंबंधाने काय काय घडले हे तुम्ही वाचलेच, असे असता टिळक स्वतः प्रत्येक शाळेत गेले व आपल्या हाताने हस्तपत्रके वाटली हे शात्रीत झाले नाही. म्हणून त्यानी मुलाना चिथावले हे म्हणणे वेअब्रू- कारक होते काय? कोणताहि मतप्रसार कसा होत असतो हे तुम्हाला माहितच आहे. जर्मनीने अमेरिकेत व बोल्शेव्हिक लोकानी रशियात मतप्रसार कसा केला हे मी काय सांगावयास पाहिजे? शिवाजी-गणपति उत्सव कित्येक लोकाना आवडत नव्हते ही गोष्ट खरी. पण इतर पुष्कळाना ते आवडत होते. कोल्हापूरच्या महाराजांचे व ह्यांचे बनत नव्हते म्हणून ते त्याविरुद्ध असतील. शिवाजी उत्सवाचा हेतू कीर्ति गाण्याचा. मग महाराजाना ह्या उत्सवात भाग घेण्यास हरकत नव्हती. स्वदेशीच्या बाबतीत प्रत्येक देशात व्यापार खुला असावा की संरक्षित असावा असा वाद असतो हेच खरे. पण खुला व्यापार असावा म्हणणारे लोक परदेशी वस्तूंची होळी करतात काय? फ्रान्स जर्मनी अमेरिका येथून आलेल्या वस्तूंच्या होळ्या आपल्या देशात कधी झाल्या काय? पण टिळकांचा कटाक्ष फक्त विलायती वस्तूवरच होता.. स्वराज्य याचा अर्थ साम्राज्यातील स्वराज्य असा टिळकानी सांगितला खरा. पण