पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ न्या० डार्लिंग यांचा समारोप त्यांच्या सर्व लेखातून केवळ हाच अर्थ प्रस्थापित होत नाही. अर्थात टिळकानी आपल्या साक्षीत तसे सांगितले म्हणून तेवढ्यावर विश्वास कसा ठेवावा? येथे फिर्याद जिंकावयाची म्हणून त्यानीं तसे सांगितले असेल. मोंगलांच्या इतके सैन्य इंग्रजांचे हिंदुस्थानात नाही हे लोकाना सांगण्यात टिळकांचा काय हेतू असावा? कारण मोंगलांचे इतके मोठे सैन्य असता मराठ्यांनी स्वराज्य स्थापिले असा इतिहास आहे. आखाड्याचा उपयोग केवळ क्रिकेटच्या क्लवा- प्रमाणे टिळकाना करावयाचा होता की इतर काही कामाकरिता है तुमचे तुम्हीच ठरवा. लोकावर कोरडे ओढून वर्गण्या जमविल्या ह्या गोष्टींचा खुलासा चिरोल- साहेबानी केला. तो सर जॉन सायमनसारख्या कुशल वकिलालाहि उलटविता आला नाही. टिळकानी नाशिकच्या मुलाना सदुपदेश केला खरा. पण तो तात्पुरता असे दिसते. टिळकांच्यावर खोट्या साक्षीचा आरोप शाबीत झाला म्हणून इतर आरोप काढून घेण्यात आले. पण पुढे त्या खटल्यातील शिक्षा रद्द झाली. त्यामुळे इतर आरोप चौकशीला पाठविले नव्हते असे ठरते काय? प्रिन्हि कौंसि- लने टिळकांचा पुरावा मान्य केला हे खरे. पण हिंदुस्थानात खोटी साक्ष देण्याचा कट करून साक्षीदार मथून साक्ष देतात ही गोष्ट प्रसिद्धच आहे. चंदावरकरानी त्या पुराव्यावर भरंवसा ठेवला नाही. निदान हे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत तरी ती स्थिति कायम होती. तात्पर्य या प्रकरणासंबंधाने चिरोल साहेबानी लिहिले ते बदनामीकारक नव्हते असे मला वाटते. पण तुम्ही काय ते ठरवा. मनुष्याचा प्रामा- णिकपणा पैशाखेरीज इतरहि रीतीने पाहता येतो असे चिरोल साहेबानी म्हटले आणि ते बरोबर आहे. Honesty and Probity असे दोन शब्दहि वेगवेगळे आहेत. सोजीर व लष्करी अधिकारी याना राक्षसाची उपमा दिली आहे. उप- मेच्या अर्थानेच तो शब्द घ्यावयाचा हे म्हणणे गैर आहे. कारण इंग्रज सरकारच्या लष्करात प्रत्यक्ष राक्षसाना अधिकारी नेमलेले नाही! पण नुसत्या उपमेवरून तरी काय सिद्ध होते? आणि सोजीराना राक्षसाची उपमा देणारा गृहस्थ तुमच्याकडून येथे नुकसानीची भरपाई मागत आहे! प्लेगच्या तक्रारी प्लेग कमिशनच्या रिपो- टीने खऱ्या ठरविल्या असे टिळकानी सांगितले. पण तो रिपोर्ट हा येथेच आहे. व सर जॉन सायमन ह्यानाहि तो उल्लेख त्यात काढून दाखविता आला नाही. या मानीव जुलमाचे वर्णन टिळकांच्या पत्रात वरचेवर येई. ह्याचा स्वाभाविक परि णाम काय व्हावयाचा तो झाला असे चिरोल साहेबानी म्हटले यात काय चुकले १ पण अशा लिहिण्याने बदनामी झाली की नाही हे तुम्हीच ठरवावयाचे आहे. टिळ- कांचा खुनाशी संबंध जोडता आला नाही हे खरे. पण त्यांची जबाबदारी इसाप- नीतीतील गोष्टीवरून ठरते. त्यातील एका गोष्टीत असे लिहिले आहे की शत्रूच्या सैन्याने प्रतिपक्षाच्या तुतारीवाल्याला पकडले. तेव्हा तो म्हणाला CC मला का मारता? माझ्या हातात तरवार नाही फक्त तुतारी आहे. मी. कोणालाहि मारले टि० उ... २३