पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्या० डार्लिंग यांचा समारोप (१५) न्या० डार्लिंग यांचा समारोप CC यानंतर डार्लिंग साहेबानी ज्यूरीला खटला समजावून सांगितला. ते म्हणाले 'हा खटला बेअब्रूचा आहे. अब्रू ही कोणालाही आपल्या मुलाइतकी किंबहुना अधिक प्रिय असते. एखादा वाईट मनुष्य असला व त्याच्यासंबंधाने खोटी विधाने केली तरी ती त्याची बेअब्रू होय. वाईट मनुष्यालाहि अब्रू असते. आता टिळकांच्या अब्रूसंबंधाने पहिली गोष्ट ही की त्याना दोन वेळा राजद्रोहाची शिक्षा झाली आहे. आणि मला कोणी राजद्रोही म्हटले तरी माझी बेअब्रू झाली अशी तक्रार मी करणार नाही असे स्वतः टिळकानीच सांगितले आहे. पण राजद्रोह हा काही गुन्हा लहान नाही. Treason च्या खालोखाल तो वाईट गुन्हा होय. Treason म्हणजे राजाविरुद्ध बेइनामी करणे किंवा हत्यार उचलणे. Treason मध्ये राजद्रोही मनुष्याने प्रत्यक्ष काही कृत्य केले असे दाखवावे लागते. पण हिंदुस्थानात म्हणजे जेथे अस्वस्थतेचा बुजबुजाट झाला आहे तेथे बाँब पडले हे राजद्रोहाचेच प्रत्यक्ष फल असे म्हणावयास काय हरकत? बेअब्रूची म्हणून जी वाक्ये पुढे आणली आहेत ती सर्व सारख्या वजनाची नाहीत. सर जॉन सायमन ह्यानी तुम्हाला बजाविले आहे की वादी तुमच्या देशातील नाही, तरी पण तुम्ही न्याय देण्याचे धैर्य दाखविले पाहिजे. पण मी म्हणतो इंग्रजाची रीतच अशी की तो केवळ आपल्या मित्रालाहि अन्याय करील पण परकीयाला केव्हाह करणार नाही. इंग्रजासारख्या उदार हृदयाच्या लोकांचे हेच ब्रीद आहे. असो. बेअब्रूचे सहा वेगळे मुद्दे करू म्हटले तरी त्यात अर्थ नाही. सहा वेगवेगळे म्हटले काय किंवा एक म्हटला काय तात्पर्य एकच. बेअब्रू ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगावयाचे कारणच नाही. आणि खरोखर चिरोल साहेबांच्या लेखानी टिळ- कांची बेअब्रू झाली की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवावयाचे आहे. हा अधिकार ज्यूरीला १८ व्या शतकात मिळाला. कारण न्यायाधीश लोक इतर लोकांच्या इतका व्यापक विचार करीत नसत. ज्यूरी ही लोकांची प्रतिनिधि म्हणून जसे लोकमत तसे ज्यूरीचे मत असले पाहिजे. कारण लोकातूनच ज्यूरी निवडली जाते. आक्षेप घेतलेल्या पैकी काही उतारे बेअब्रूकारक नाहीत, तरी काही उतारे आक्षेप घेता येतील असे वंचित आहेत. पण पुरावा देऊन प्रतिवादीला बाजू परतविता येऊ शकते. तरीपण १०० तील ९९ गोष्टी शात्रीत केल्या व एक शावीत करिता आली नाही तरी फिर्याद लागू होते. म्हणून प्रतिवादीने पुराव्याने बाजू परतविली की नाही व शाबीत न केलेले एखादे विधान उरते की काय हे तुम्ही ठरवा. पण प्रतिवादीचा दुसरा मुद्दा असा आहे की जे लिहिले ते सर्व सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांची चर्चा करण्याच्या बुद्धीने लिहिले. टिळ- कांची बेअब्रू करण्याची बुद्धि त्यात नव्हती. कायद्याच्या दृष्टीने मी असे म्हणतो की चिरोल साहेबांचे लिहिणे सार्वजनिक महत्त्वाचे. पण केलेली टीका रास्त भाग ४ ८३