पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ लो० टिळकांचे चरित्र भाग १ विषयावर त्यानी कलकत्त्यास १९०७ साली भाषण केले, तसेच २५ जून १९०७ रोजी शिवाजी उत्सवात भाषण केले, यावरून त्यांची मते उघडच दिसतात. मूळ पत्र प्रसिद्ध करा असे टिळक आग्रहाने म्हणतात. त्यावर मी इतकेच म्हणतो की ते पत्र स्वतः टिळकाना किंवा त्यांचा कोणी विश्वासू मनुष्य येईल त्याला दाख- वायला मी तयार आहे. आणि ते वाचल्यावरहि जर प्रसिद्ध करण्याचा आग्रह टिळक धरतील तर ते मी वर्तमानपत्राकडे पाठविण्याला तयार आहे. 23 या शेवटल्या खुलाशावर टिळकांचे म्हणणे असे की “ ते पत्र पहावयाला मी जात नाही किंवा माझा मनुष्यहि पाठवीत नाही. गोखल्यांनी स्वतः ते जसे भूपें- बाबूकडे पाठविले तसेच ते स्वतः होऊन प्रसिद्ध करावे. मी त्यात कशाला ? वास्तविक तिऱ्हाइत असे म्हणणार की गोखले टिळकाना ते दाखविण्याला व त्यानंतर प्रसिद्ध करण्यालाहि जर तयार, तर खुलाशाऐवजी किंवा खुलाशाबरोबर ते प्रसिद्धच करते तर काय बिघडते ? व दुसरा कोणी तिन्हाइत असे म्हणणार की पत्र आपण होऊन प्रथम प्रसिद्ध न करण्याची गोखल्यांची कारणे बरोबर असोत वा नसोत, पत्र दाख- वितो म्हटल्यावर टिळकानी तरी स्वतः ते पाहण्याला किंवा ते पाहण्यास कोणी आपला मनुष्य पाठविण्याला काय हरकत होती ? पण खरा प्रकार असा दिसतो की ते पत्त्र जसेच्या तसे प्रसिद्ध होणे दोघानाहि सारखेच अनिष्ट असावे ! पुष्कळ वेळा कोर्टात असा प्रकार घडतो की दोन्ही पक्षकार एखाद्या विशिष्ट साक्षीदारावर दस्तऐवजा- वर भर दिल्याचे दाखवितात आणि समन्स काढून तो साक्षीदार किंवा दस्तऐवज कोर्टात आणवितातहि. पण कोणीहि आपल्यातर्फे त्या साक्षीदाराची साक्ष घेत नाही. किंवा तो दस्तऐवज आपल्यातर्फे पुराव्यात दाखल करीत नाहीत. पण तोंडाने मात्र दोघेहि त्याकडे बोट दाखवून म्हणत असतात 'त्यांत काय ते आहे.' वैद्याने तिखट मना केलेला मनुष्य समोर मिरची टांगून जेवतो म्हणतात त्यात- लाच हा प्रकार झाला. पण हे सर्व सोडून देऊ. आमच्या मते खरा मुद्दा असा की ' मी हल्ली सरकारावर बहिष्कार घालणारा नाहीअसे टिळक म्हणते तर ते एक असो मला चालले असते' असे जर गोखले खुलाशात लिहितात, आणि टिळ- कानी आगस्टच्या जाहीरपत्रकात केलेले ते विधान स्पष्ट आणि ताजे असे होते, तर समेटाच्या कामापुरते ते पुरे होते. 'मी केव्हाच बहिष्काराचे समर्थन केले नाही' हे टिळकांचे वाक्य घेऊन जुने आधार देऊन ते खोडीत बसण्यात काय अर्थ ? १९०७-०८ साली आपण काय बोललो हे टिळक विसरले असतील तर त्याना त्याची आठवण कोणी करून द्यावयाची! टिळक काय हे गोखल्याना माहीत व गोखले काय हे टिळकाना माहीत ! कोणी कोणाचा स्वभाव बदलूं शकत नव्हता. प्रश्न इतकाच होता की समेटाचा जो प्रयत्न चालला होता व इतर प्रांतातील नेमस्त लोकहि त्याला जो पाठिंबा देत होते ते, काही असले तरी राष्ट्रीय सभा फिरून संयुक्त व्हावी याच मुद्दयावर टिळक पुढे जन्मभर कोणते धोरण स्वीकारतील याची हमी त्यांच्यापासून हा पाठिंबा देणाऱ्यानी मागितली नव्हती किंवा ते तशी