पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ असंबद्ध विधाने केली आहेत. ह्याचा विचार तुम्हीच करा. खुनी लोक पकडले म्हणजे ते काय वाटेल ते बोलत सुटतात. चाफेकर काहीहि बोलो. पण त्याचा टिळकाशी संबंध येत नाही इतकेच मला दाखवावयाचे आहे. बरे चाफेकराचे आत्मचरित्र पाहावयाला द्या अशी टिळकानी विनंति केली ती मान्य करण्यात आली नाही. आणि चिरोल साहेबाना मात्र सरकारने ते कागद दाखविले! १९०८ च्या खटल्याचेहि असेच आहे. ज्यूरीला लेख राजद्रोही वाटले टिळकाना शिक्षा झाली ह्या सर्व गोष्टी असोत. परंतु त्या लेखामुळे बंगाल्यात बाँच झाले किंवा त्यानंतर झाले असते ह्या म्हणण्याला काही आधार नाही. आणि चिरोल साहेवानी असे निराधार लिहिले म्हणूनच टिळकांचा दावा तुम्ही दिला पाहिजे. जॅकसनच्या खुनाच्या वेळी टिळक तुरुंगात होते एवढ्यावरून तरी टिळकांचा त्या खनाशी काही संबंध पोचत नाही एवढेच मी म्हटल्याचे कार्सन साहेब तुम्हाला भासवितात. पण तसे नव्हे. जॅकसन साहेवासंबंधाने केसरीत कधीहि प्रतिकूल विधान आलेले नाही. उलट नाशिकच्या मुलाना टिळकानी सदुपदेश केल्याचा पुरावा झाला आहे. वर्तमानपत्रातील लेखावरून जॅक्सनला मारण्याची कल्पना सुचली असे कान्हेरेहि म्हणत नाही. कर्वे नांवाच्या एका मित्राच्या सांगण्यावरून आपण हे केले असे तो स्पष्ट म्हणतो. उलट जॅकसन साहेबाला मी विनाकारण मारले असा खेदच तो प्रदर्शित करतो. ह्या खेदाचे कारण असे की जुलमाचे प्रकार वर्तमान- पत्रात वाचून राग आला. पण जॅकसन साहेबाचा खून करणे हा काही त्याच्या प्रतिकाराचा उपाय नव्हता. तात्पर्य हे सहा मुद्दे असे आहेत. नुकसान भरपाई संबंधाने माझे म्हणणे असे की तुमच्या निकालाकडे ब्रिटिश साम्राज्यातील पुष्कळ लोकांचे डोळे लागून राहिले आहेत. कारण ब्रिटिश ज्यूरीकडून न्याय निःपक्ष- पातीपणाने मिळतो अशी त्यांची समजूत आहे. काही लोक ब्रिटिश न्यायदेवतेला नावे ठेवणारेहि आहेत. अशा लोकांची विचारसरणी चूक आहे. कारण इंग्लंडात कोणीहि कोठलाहि मनुष्य कोणत्याहि जातींचा व धर्माचा असो तो न्याय मागेल तर तो त्याला अवश्य मिळतो अशी ही आपली संस्था आहे. टिळक पैशाच्या रूपाने नुकसान भरपाई मागत असले तरी खरोखर त्याना पैसे नकोत. तुमचा निकाल पाहिजे. चिरोल साहेबानी माफी मागून एखाद्या हिंदी फंडाला वर्गणी दिली असती तर त्यांचे नुकसान भरून पावले असते. पण तसे न करिता त्यानी जत्रा- नीत असे सांगितले की मी एकहि शब्द परत घेत नाही. तेव्हा नुकसान भरपाई करून देणे प्राप्तच. तरीपण ही नुकसान भरपाई पैशाच्या दृष्टीने माफक असली तरीहि आमचे काही म्हणणे नाही. टिळकांवर आलेल्या दोषारोपाचे निराकरण व्हावे इतकाच त्यांचा हेतू आहे.