पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ नाही. पण फिर्यादच येथे झाल्यावर तुम्ही आम्ही काय करणार? हे सगळे लेख वाचून टिळकातर्फे निकाल द्यावा असे तुम्हाला वाटले तर तो खुशाल ग्रा. खरा तो न्याय कोणाच्याहि पदरात टाकलाच पाहिजे. पण ह्या खटल्याला सार्वजनिक स्वरूप आहे आणि ते महत्त्वाचे आहे हे विसरू नका. कारण तुमच्याकडून अनु- कूल निकाल मिळाला म्हणजे तो घेऊन हे हिंदुस्थानात जाऊन लोकाना सांगणार की मी असे बोललो असे लिहिले तरी विलायतेतील ज्यूरीने माझी अब्रू साफ करून दिलीच की नाही? फिरून तसे बोलायला लिहायला मला कोणाच्या देवाची भीति! हिंदुस्थानात गोरे अधिकारी आपले कठीण काम करीत असतात ब्रिटिश सरकार शांतता राखीत असते ह्या सर्वांना तुमच्या अनुकूल निकालाची किती अडचण होईल ही गोष्ट लक्षात ठेवा. मधून मधून राजनिष्ठादर्शक शब्द टिळकांच्या लेखात येतात. पण त्याना भुलून जाऊ नका. पूर्वी ज्याना राक्षस म्हटले त्याच इंग्रजाना १९१४ साली आपल्या कामापुरते टिळकानी स्वातंत्र्य- प्रिय इंग्रज असे विशेषण द्यावे हे सरळच आहे. १९१४ सालच्या जाहीरनाम्यात काय पण टिळकाना राजनिष्ठेचा कढ आला होता! जाहीरनाम्यात 'God save the King' एवढेच त्यानी म्हणावयाचे ठेवले होते. पण युद्ध सुरू झाल्यानंतर फिरून त्यांचे वर्तन कसे झाले? तात्पर्य हा सर्व मायावीपणाचा खेळ आहे! १८९३ पासून १९१८ पर्यंतचे टिळकांचे एकंदर चरित्र लक्षात आणा आणि काय द्यावयाचा तो निकाल द्या. (१४) सर जॉन सायमन यांचा समारोप यानंतर सर जॉन सायमन ह्यानी अखेरचे भाषण केले. ते म्हणाले "तुम्हाला श्रम पडले ह्याबद्दल कार्सन साहेबांप्रमाणे मीहि तुमची माफी मागतो. त्यानी तुम्हाला प्रथम एक वेळ सांगितले की "मी बोलून चालून वकील! मी अनुमानाने सर्व विधाने करितो. माझ्या स्वतःचा विश्वास अमुक म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. वकीलाला निष्ठा कसली?" माझेहि उलट तसेच आहे. मीहि ह्या ठिकाणी वकील म्हणूनच आलो आहे. आपल्या अशीलाची मते किंवा कृत्य ही स्वतःची मते किंवा कृत्य अशी भावना ठेऊन कोणीहि त्याचे समर्थन करीत नसतो. जज्ज काय ज्यूरी काय वकील काय पुराव्याच्या रूपाने पुढे येईल तेवढ्या पुरतेच त्यांनी बोलावयाचे. टिळकानी केसरी मराठ्यात इंग्रज सरकाराविरुद्ध लिहिलेले सर्वच लेख इतके कडक तापट निरर्गल लिहिणे हे योग्य होते की नाही असाहि प्रश्न नाही. ज्याच्याविषयी आपल्या मनात प्रेम नाही सहानुभूति नाही किंबहुना अप्रिती किंवा द्वेष आहे अशा मनुष्यालाहि ज्यूरीतील लोकाना नाइला- जाने का होईना पण न्याय द्यावा लागतो. तसेच आपण येथेहि करू. कार्सन साहेबानी शेकडो नावे वाईट वाईट लोकांची म्हणून घेतली. त्यांच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला व ते टिळकाशी आणून त्याना भिडविण्याचा प्रयत्न केला. पण ती