Jump to content

पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ सर एडवर्ड कार्सन यांचा समारोप काय? टिळकांची नुकसान भरपाईं योग्य रीतीने ज्याने होईल इतके हलके नाणे जगात आहे असे वाटत नाही? आपण त्यांच्यातर्फे निकाल देऊन जगाला असे जाहीर करणार काय की टिळकांचे मार्ग बरोबर होते? टिळकांची अब्रू हिंदुस्था- नात किती आहे हे तिकडील एखाद्या कोर्टात ही फिर्याद झाली असती तर त्यांना कळून आले असते. आमच्या इकडेहि एखादा मोठा मनुष्य बेअब्रूची फिर्याद करतो. पण त्याचा सगळा जन्म सामान्य रीतीने प्रतिष्ठेने गेलेला असतो. आणि एखाद्या विधानाने त्याच्या अब्रूला जखम होण्यासारखी असते म्हणून. टिळकांच्या अंगावर अशा रीतीने जखम होण्याला जागाच शिल्लक नाही. टिळ- कांची वर्णने वाचली तर लोकाना असे वाटेल की हिंदुस्थानात वरपासून खाल पर्यंत खरा न्याय मिळण्याला कोठे जागाच शिल्लक नव्हती. म्हणे मी गोरक्षणाची चळवळ स्वतः सुरू केली नाही. पण म्हणून काय झाले? त्या चळवळीचा फायदा घेऊन मुसलमान व सरकार यांच्याविरुद्ध द्वेष उत्पन्न केलाच की नाही? सरकार मुसलमानाना पक्षपात करते असे लोकाना सांगून टिळकानी दोघांच्या- विरुद्ध द्वेष पसरविला व दंगे झाले त्याचे कारणहि तेच. आपल्या देशात नाही का काही वर्तमानपत्रे असे करीत? प्रथम एखाद्या गोष्टीबद्दल आपणच खोट्या अफवा उठवाव्या व मग फिरून लिहावे की निरनिराळ्या अफवा ऐकून लोक बेदील झाले आहेत. त्यातलाच हा प्रकार! स्वदेशी चळवळीचीहि तीच गोष्ट. प्लेगचे उपाय अप्रिय होते म्हणतात! पण त्या अप्रियतेचा फायदा टिळकानी घेतला इतकेच ह्या पुस्तकात म्हटले आहे. त्यांनी लिहिले यापेक्षा अधिक कडक लेख लिहिणे शक्य तरी होते काय? दिवस दहावा - (२० फेब्रुअरी १९१९). गोखल्यांबद्दल इतर काही असो पण चुकांबद्दल माफी मागण्याची तरी त्यांच्या अंगी संभाविती होती. टिळकांचे लेख वाचून त्यांची बुद्धिमत्ता विचार- शक्ति यांचे कौतुक वाटते. पण वाईट इतकेच वाटते की त्याचा त्यांनी देशाच्या हिताकडे उपयोग केला नाही. दिवाणी कोर्टात प्रथम टिळकाविरुद्ध झालेला दावा प्रिव्ही कौंसिलने अखेर त्याना बहाल केला. पण १८९७ व १९०८ साली ज्या त्याना शिक्षा झाल्या त्यावर अपील होऊन प्रिन्हि कौन्सिलने खालचा निकाल फिरविला नाही. टिळक तुरुंगात गेल्यावर जे झाले ते सर्व परस्पर झाले. त्याकरिता त्याना जबाबदार धरू नका असे सायमन साहेब म्हणतात. पण तसे म्हणून कसे चालेल? विषवृक्ष लाविला म्हणजे मूळापासून फळापर्यंत एकच झाड! असो. माझे भाषण फार लांबले त्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला असेल हे मी जाणतो. पण टिळकानी हिंदुस्तानात फिर्याद मांडली असती म्हणजे सर्वां- चाच हा लास चुकला असता. तुमच्या पुढे आलेल्या लेखात धर्मकृत्य उत्सव वेद समारंभ वगैरे अनेक अशा गोष्टी आल्या की ज्याची तुम्हाला काहीच माहिती शु