पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ सर जॉन सायमन यांचा समारोप सर्व नावे आपणाला विसरली पाहिजेत. तसेच शिवाजीने अफझुलखानाला मारले की नाही किंवा प्रो. गोखल्यानी मागितली तशी माफी मागावयाला पाहिजे होती की नाही हाहि प्रश्न तुमच्यापुढे नाही. चिरोल साहेबांच्या पुस्तकात केलेली विधाने बरोबर आहेत की नाही इतकाच प्रश्न आहे. आतापर्यंत दोन वेळा टिळकाना राजद्रोहाची शिक्षा झाली. ती होवो. चिरोल साहेबांचे त्यांच्या विषर्याचे मत कितीहि वाईट असो. पण पुस्तकात लिहिले ते बरोबर की चूक? व सार्वजनिक हितसंबंध लावून मला टीका करण्याचा अधिकार पोचतो असे चिरोलसाहेबानी कैफियतीत म्हटले आहे तो हक्क त्याना कितपत पोचतो? त्यातील काही गोष्टी सामान्य असल्या तरी फारच वाईट आहेत. सामान्य प्रामाणिकपणाहि टिळकांच्या अंगी नाही असे म्हटलेले ते कसे सोसून घेतील? शिक्षा देणाऱ्या जज्जानी किंवा सरकारी वकिलानी ज्या गोष्टी टिळकांच्या अंगी लावल्या नाहीत अशा गोष्टी चिरोलसाहेबानी त्यांच्या अंगाला चिकटवल्या आहेत. टिळकांची योग्यताहि चिरोलसाहेबानी लक्षात घेतली नव्हती. सामान्य मनुष्य दोन वेळा कायदे मंडळाचा सभासद कसा निवडून येईल? जो खुनासा- रख्या कृत्याना उत्तेजन देईल त्याच्यावर लोकांची निष्ठा कशी बसेल? ज्या सँड- हर्स्टसाहेबानी टिळकाविरुद्ध साक्ष दिली त्यानीच आपल्या हाताने त्यांची नाम- दारी कायम केली होती. या अनेक लेखातील प्रत्येक शब्द बरोबर आहे असे म्हणण्यासारखा मी अधम नाही. पुराणातील वगैरे उदाहरणे दिल्यावरून कार्सन साहेबानी टिळकाविषयी फारच कलुषित मन करून दिले आहे. पण दाखले हे पट- णारेच घ्यावे लागतात. समजा मी असे म्हटले की, मी कार्सन यांच्यानंतर व न्या. डार्लिंग यांच्यापूर्वी, म्हणजे या दोघांच्या दरम्यान, भाषण करीत आहे म्हणून ही गोष्ट सांगताना मीहि I am between the devil and the deep sea' असे म्हटले तर मी या दोघावर कोणत्याहि प्रकारचे शिंतोडे उडवितो असे कोणी म्हणणार नाही. रँडसाहेबांचा खून झाला त्याला केसरीतील लेखांचा संबंध याना जोडता आला. कारण प्लेगच्या संबंधात रँडसाहेबांचे नाव वरचेवर येत होते. पण जॅकसनसाहेबांचा खून झाला तर त्यांचे नाव केसरीत कधीतरी आले होते काय? बरे कोठे पुणे कोठे नाशिक! या सर्व गोष्टी काय चिरोलसाहेबाना माहित नव्हत्या? बरे. मुलानी गुन्हा केला म्हणजे आपल्या गुन्ह्याला ती दुसऱ्या कोणाचे तरी कारण लावतात ही रीतच आहे. आपल्या देशात असेच घडत नाही काय? तू चोरी का केलीस असे वि चारले म्हणजे सांगतात 'सिनेमातील चित्रे पाहिली आणि आणामाल्यातील कादंबऱ्या वाचल्या त्यामुळे चोरीची कल्पना सुचली.' जबान्या घेताना याच मुलानी एकदा एक एकदा भलते असे वाटेल ते सांगितले आहे. चिरोलसारख्या सूक्ष्म दृष्टीच्या मनुष्याला ही गोष्ट उमजल्याशिवाय राहिली नसेल. कित्येक सन्मान्य लोकहि टिळकांच्या लेखाना नावे खचित ठेवतील. तरी पण चिरोलसाहेबानी ज्या गोष्टी