पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ पंडित नाहीत. आरोपांचा उल्लेख केला तसा त्यानी दोषमुक्ततेचाहि उल्लेख केला आहे. तेव्हा त्यात वेअब्रूकारक असे काय घडले? न्या. चंदावरकरांचा निकाल सारांशरूपाने दिला तो बरोबर दिला की नाही आणि त्यावरून त्यांनी केलेली विधाने रास्त होती की नव्हती हेच दोन प्रश्न ज्यूरीपुढे आहेत. डार्लिंग—शिवाय या विषयाला सार्वजनिक महत्त्व होते की नाही व त्यामुळे चिरोल साहेबानी केलेली चर्चा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने केली आहे की नाही हाहि प्रश्न राहतोच. कार्सन - – १८९७ साली टाइम्सने टिळकांची माफी मागितली. पण तिचा या प्रकरणी टिळकाना काही उपयोग होणार नाही. वर्तमानपत्रे पुष्कळ वेळा पैशाच्या दृष्टीने चालविली जातात. हजारो रुपये खर्चण्यापेक्षा माफी मागितलेली बरी असे, टाइम्सला वाटले असेल. शिवाय ग्लोब पत्रातील नुसते उतारे आपण घेतले स्वतःचे म्हणून काहीच लिहिले नव्हते म्हणून माफी मागून टाकून मोकळे व्हावे आणि दगदग वाचवावी असेच टाइम्सला वाटले असेल. खुनाच्या चळवळीचे उत्पादक टिळक होते किंवा त्या चळवळीची व्यवस्था त्यांचेकडे होती असे आम्ही कोठेच म्हटले नाही. आणि तसे असते तर टिळक फाशी जाते हे काय सांगा- वयाला पाहिजे? बेअब्रूची फिर्याद करण्याला टिळक जगले ह्याचाच अर्थ टिळक खुनी चळवळीत सामील नव्हते. आमचे म्हणणे इतकेच की, टिळकानी अशा गोष्टीचे जे समर्थन म्हणून केले ते बरोबर नव्हते. कोणाचा हेतू चांगला असेल. म्हणून काय झाले? परिणाम पहावे लागतात. आणि त्या पुस्तकात मुख्यतः परिणाम लक्षात घेऊनच लिहिले आहे. ग्लोब पत्राने वाह्यात विधाने केली असतील म्हणून माफी मागावी लागली असेल, त्याचे मला काय? ह्या पुस्तकातील विधाने जपून साधार केली आहेत म्हणून आम्ही माफी मागितली नाही. टिळकानी राजद्रोहाच्या दोन मोहिमा केल्या. एकाच्या शेवटी रँडसाहेबांचा खून झाला. दुसन्याच्या शेवटी जॅकसनसाहेबांचा खून झाला. ह्या दोन्ही चळवळीत त्यानी लोकांच्या कानावर विषारी विचारांचा सारखा वर्षाव चालू ठेवला होता. पहिल्यात मुसलमानांचा द्वेष व्यवस्थेबद्दलचा क्षोभ दुष्काळाची आपत्ति वगैरे प्रसंग आले होते. रँडचा खून झाला तो वाईट असे त्यांनी लिहिले पण तो त्यानी सकारण होता असे प्रतिपादिले. आणि सुटून आल्यावरहि त्यांची मनोवृत्ति कशी होती हे जाइल्स साहेबानी सांगितलेच आहे. दुसऱ्या चळवळीत त्यानी बंगालच्या फाळणीचा फायदा घेतला आणि वाँवगोळ्याचे त्यांनी समर्थन केले. याहि प्रसंगी त्यानी सर- कारच्या अडचणीचा फायदा घेतला. प्रत्येक राष्ट्रात पाहता चळवळे लोक अशाच गोष्टी करीत आले आहेत. पण मी आपणाला असे विचारतो की अशा एखाद्या चळवळ्या मनुष्याने किरकोळ विधानानी बेअब्रू झाली असा कांगावा करून, नुकसान भरपाई कोर्टात मागितल्याचे उदाहरण आपणाला माहीत आहे प्लेग