पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ राष्ट्रीय सभेचा वाद १७ वेगळा संघ काढू.' तात्पर्य सुबराव यांच्या ह्मणण्याप्रमाणे टिळकांचा कार्यक्रम जुना १९०७ चाच होता. हा कार्यक्रम मला माहीत नव्हता असे नाही. पण मी सम- जत होतो की तो त्यावेळेपुरताच असेल. राष्ट्रीय पक्षातील निरनिराळ्या लोकाशी माझे बोलणे झाले त्यावरून माझी अशी समजूत झाली होती की जुने मार्ग टाकाऊ व हल्लींचे काँग्रेसचे धोरण हेच योग्य असे त्याना वाटत असावे. टिळकानी ऑगस्ट- मधील आपल्या जाहीर पत्रांत हीच गोष्ट लिहिली होती. पण सुबरावानी टिळ- कांचे संभाषण ह्मणून जे सांगितले त्याने एकदम डोक्यात दगड पडल्यासारखे झाले. ह्मणून घटना दुरुस्तीच्या सूचनेला मी प्रथम संमति दिली होती ती परत घेतली आणि सुबराव व बेझंटबाई याना तसे कळविले. मी जे गुप्तपत्र ह्मणून भूपेंद्रबाबूंना पाठविले ह्मणतात त्यात ह्याच गोष्टी लिहिल्या होत्या. ते पत्र इतर काही लोका- नाहि मी दाखविले होते. त्यावर 'गुप्त' अशी सूचना लिहिली ह्याचा अर्थ ते वर्त- मानपत्रात छापले जाऊ नये इतकाच होता. मी मद्रासला गेलो असतो तर हा खुलासा समक्षच केला असता. शिवाय मी पत्र लिहिण्यापूर्वी विजापूरकराना दाख- विले होते. १९ डिसेंबर रोजीं समेटाच्या विषयावर माझे व टिळकांचे बोलणे झाले. त्यात मी त्याना स्पष्ट सांगितले होते की समेटाला संमति देणे आता मला वरील कारणामुळे शक्य नाही व तुह्मी राष्ट्रीय सभेबाहेर राहाल तरच बरे. "टिळकांची तक्रार अशी की सुबराव यानी त्यांच्या भाषणाचे जे लेखी टिप्पण केले ते मी आधारभूत मानावयास पाहिजे होते. संभाषणाच्या त्यांच्या तोंडी रिपो- वर मी विसंबणे योग्य नव्हते. पण हे टिप्पण माझ्या हाती पुढे एक आठवड्याने आले. माझे पत्र त्याच्या आधीचे आहे. शिवाय ते हाती असते तरी काय झाले असते ? बोलून चालून ते टिप्पण. त्रोटक सारांश. शिवाय टिळकानी त्यात दुरुस्ती केलेली. प्रत्यक्ष संभाषण चराच वेळ झालेले. सुबरावानी तोंडी सांगितल्या अशा काही गोष्टी त्या टिप्पणात नव्हत्या. ते कसेहि असले तरी 'आमच्या पक्षाच्या इष्ठ मागीना बहुमताने संमति मिळवू' हे त्यांचे म्हणणे शिल्लकच राहते. व त्यांचे मार्ग १९०६- १९०७ चे हे उघड आहे. त्या चळवळीत टिळक काँग्रेसला 'भिक्षांदेही' करणारी सभा असे ह्मणत. काँग्रेसच्या पुढान्याना स्तुतिपाठक म्हणत. आणि अडवणूक व सार्वत्रिक बहिष्कार हीच त्यांची तेव्हां मुख्य साधने होती. 'सरकारावर बहिष्कार ' हे शब्द माझे नाहीत व भूपेंद्र बाबूंचेहि नाहीत. ते इतर लोकानी उच्चारले अस-- तील. त्यावरून बाईंनी तार केली व टिळकानी त्याला उत्तर पाठविले. आणि भूपेंद्र- बाबूनी जी माफी मागितली तिचा अर्थ इतकाच की खाजगी पत्रातील गोष्टी लोकां- पुढे त्यानी आणू दिल्या याबद्दल त्याना खेद झाला. टिळक एवढेच हाणून राहाते की हल्ली सरकारावर मी बहिष्कार घालणारा नाही तर ते ठीक होते. पण पूर्वीहि केव्हा मी बहिष्कार घाला असे हाटले नव्हते असेहि टिळक लिहितात तेव्हा जुन्या गोष्टींची विस्मृति त्याना पडली इतकेच मी झणतो. ' नव्या पक्षाची मते ' या टि० उ... २