पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र (१२) सर एडवर्ड जाइल्स यांची साक्ष नंतर सर एडवर्ड जाइल्स ह्यांची साक्ष झाली. त्यानी सरतपासणीत सांगितले की "सर्व इलाख्याचा मी शिक्षणाधिकारी होतो. वर्तमानपत्रातील उतारे मजकडे येत. ते मी वाचीत असे. मीहि गावात जाऊन प्लेगची व्यवस्था कशी होते हे पाहिले आहे. सोजीर लोकांची वागणूक फारच ममताळूपणाची होती. ती कशी होती ह्याचे मी वर्णनच करू शकत नाही! अत्याचार घडले असते तर ते माझ्या कानावर आले असते. शिक्षणाधिकारी म्हणून मलाहि प्लेग वगैरे गोष्टीत लक्ष घालावे लागत असे. शाळातून राजकीय चळवळीचा प्रवेश झाला होता. त्याकरिता मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला शिक्षाहि केली. शिव- राम महादेव परांजपे हे एका कॉलेजात प्रोफेसर होते. त्याना व दुसऱ्या एका प्रोफेसराला कॉलेजातून काढावे लागले. टिळक तुरुंगातून सुटून आल्यावर मला भेटले होते. त्यांचे संस्कृत हस्तलिखितासंबंधाने माझ्याकडे काही काम होते. ते आणि मी दोघेहि बसून बोलत होतो. मला वाटले टिळक आता राजकारण सोडून देऊन विद्याव्यासंगात पडणार असतील. भेटीचे काम झाल्यावर इतर गोष्टी निघाल्या. त्यात राजकारणाने शाळा बिघडल्याचा मुद्दा निघाला होता. " सायमन – प्रश्न विचारल्याशिवाय साक्षीदार उगाच लांबलचक गोष्टी कशा सांगत आहे हे कोर्टाने पाहिलेच असेल! ७२ भाग ४ डार्लिंग - सगळ्या सिव्हिल सर्व्हिसच्या लोकाना अधिक बोलण्याची संवयच असते! प्र० – तुमच्या व टिळकांच्या भाषणात काय निघाले? उ० – त्यांचे खरे मत चळवळीबद्दल काय होते हे मी काढून घेत होतो. त्यांच्या मनाला अनेक कप्पे व दालने होती असे मला वाटते. काही वेळा - नंतर टिळक आवेशात येऊन बोलू लागले. [ या ठिकाणी कोर्टातील काही लोक · हसले. तेव्हा जाइल्स साहेब म्हणाले 'माझ्या बोलण्याने लोकांची करमणूक होत आहे ह्याबद्दल मला आनंद वाटतो' ].

प्र० - पण चळवळीबद्दल ते काय म्हणाले? उ० – टिळक म्हणाले 'हल्ली- च्या पद्धतीने चळवळ केली तर फुकट. सरकारच्या मनाला धक्का अधिक असेल अशी अधिक कडक चळवळ झाली पाहिजे. ' सर सायमन याजकडून उलट तपासणी प्र० - पण ही सगळी गोड २० वर्षांपूर्वीची जुनी? उ० - होय. यानंतर कमिशनपुढे घडलेल्या पुराव्याविषयी चर्चा सुरू झाली. आणि काही कागद दाखल केल्यावर कोर्टाचे काम संपले.