पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ सर चार्लस लॅब यांची साक्ष प्र० – तुमच्याजवळ ह्या बाबतीत टिळकानी पत्रव्यवहार केला की नाही? उ० – केला असेल पण समक्ष भेट झाल्याचे स्मरत नाही. दुष्काळी वगैरे कामेहि त्याच वेळी चालू होती. सर एडवर्ड कार्सन याजकडून फेरतपासणी प्र० – ह्या दोन आपत्तीमुळे लोकांमध्ये क्षोभ झाला त्याचा फायदा टिळ- कानी घेतला की नाही? उ० – होय. प्र० - तुमचे अधिकारी व सोजीर लोक ह्यानी एकंदरीने फार चांगले काम केले असे तुमचे म्हणणे होते की नाही? उ० होय. (११) सर चार्लस लॅब यांची साक्ष ह्यानंतर सर चार्लस लॅब यांची साक्ष झाली. त्यानी सरतपासणीत सांगि- तले की " मी प्लेग कमिटीचा अध्यक्ष होईपर्यंत माझ्याकडे तक्रारी येत नव्हत्या. ह्या दिवसातील केसरी मराठा पत्रातील लेख मी पहात होतो. " सर जॉन सायमन याजकडून उलट तपासणी प्र० - त्यावेळी मुंबई इलाख्यात पुष्कळ वर्तमानपत्रे होती? उ० होय. प्र० - पुष्कळ पत्रातून केसरी मराठ्यातल्या सारखे लेख येत होते? उ०- काहीतून येत असतील. प्र० – अतिशयोक्तीची किंवा आक्षेपकारक वर्णने इतरांच्या पत्रातून आली असतील? उ० - होय. पण टिळकांच्या दोन पत्रातून विशेष येत होती. प्र० – रँडसाहेबानंतर दुसऱ्या प्लेगच्या वेळी अशा तक्रारी कमी होत्या? उ०- मला तशी बरोबर तुलना करिता येणार नाही. दुसऱ्या प्लेगच्या वेळी मी तेथे नव्हतो, प्र० – हळू हळू प्लेगव्यवस्थेचा कडकपणा कमी करण्यात आला की नाही? उ० – सांगता येत नाही. पण दुसरी प्लेग कमिटी नेमल्यानंतर तसे घडले असेल. प्र० - तुम्ही नवीन व्यवस्था केली ती लोकाना अधिक बरी वाटली की नाही? उ० – मला तशी तुलना करिता येत नाही. कार्सन याजकडून फेरतपासणी प्र० – प्लेगचे मान कमी झाल्यामुळे व्यवस्था ढिली केली असेल? उ०- होय. तसेच असावे. प्र० - तुम्ही जे भाषण केले व ज्यावर टिळकानी टीका केली ते भाषण सर- कारी हुकमावरून केले असेल १ उ० - होय. पण ते लिहिले मी,