पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर एडवर्ड कार्सन यांचा समारोप दिवस नववा - (१९ फेब्रुवारी १९१९) फिरून या दिवशी मुंबईस कमिशनपुढे घडलेल्या निरनिराळ्या लोकांच्या जबान्या प्रतिवादीतर्फे वाचून व चर्चा होऊन दाखल करण्यात आल्या. परंतु निरनिराळ्या लोकांच्या निशाण्या लोकांची नावे त्यातील ग्राह्य अग्राह्य मजकूर वगैरे अनेक किचकट मुद्दे त्यात येणार असल्यामुळे त्याचा तपशील आम्ही येथे देत नाही. प्रतिवादीतर्फे कशा प्रकारचे कागद दाखल करण्यात आले याची कल्पना टिळकांच्या जवानीवरून वाचकास आली असेलच. पूर्वी एके ठिकाणी आल्याप्रमाणे ह्या पुराव्याच्या कागदाच्या भान्यानी कोर्टातील एक सबंध बाक अडून गेले होते. या चर्चेत २-२॥ तास गेल्यावर न्यायमूर्ति डार्लिंग ह्यानी असा निकाल दिला की केवळ कायद्याच्या अनुरोधाने अमुक एका मुद्यावर वादीतर्फे निकाल द्यावा आणि तो मुद्दा बाजूला काढून टाकावा असे मला ज्यूरीला सांगता येत नाही. सहा मुद्यावर वादीने आक्षेप घेतले आहेत. सहा मुद्रा- वर प्रतिवादीतर्फे आपल्या समर्थनार्थ पुरावा देण्यात आला आहे. यामुळे सहाहि मुद्यांचा निकाल पुरावा लक्षात घेऊन ज्यूरीने अखेर देण्याचा आहे. आता सर एडवर्ड कार्सन ह्यानी ज्यूरीला उद्देशून काय सांगावयाचे ते सांगावे. तेव्हा सर एडवर्ड कार्सन यानी समारोपाच्या भाषणाला सुरवात केली. भाग ४ ७३ (१३) सर एडवर्ड कार्सन यांचा समारोप ते म्हणाले " 'खटला संपत आला याचा मला आनंद होतो. ज्यूरीतील लोकाना असे वाटले असेल की आम्ही खटला उगाच लांबवतो. पण खरोखर तसे नाही. खटला महत्त्वाचा व बराच भानगडीचा आहे. ताईमहाराज प्रकरणासंबं- धाने प्रथम इतकेच सांगतो की ते सर्वस्वी खाजगी प्रकरण आहे. त्यात टिळ कांच्या राजकारणाचा संबंध नाही. या मुद्याला एका तऱ्हेने टिळकानी उगीचच विशेष महत्त्व दिले आहे. या प्रकरणात फौजदारी व दिवाणी दोहोतील अखेरचे निकाल आपल्यातर्फे झाले व असे असता पल्यावर चिरोल साहेबानी व्यर्थ टीका केली असे टिळकांचे म्हणणे. पण हे पुस्तक १९९० साली प्रसिद्ध झाले. त्यानंतर यातील काही निकाल झाले असले तरी काही आधी झाले आहेत. ह्या पुस्तकाच्या आधी न्यायमूर्ति चंदावरकर यानी खालील कोर्टाचा हुकूम अमान्य करून तो फिरविला होता. आणि त्यावरून असे उघड दिसते की ताई महाराजा- सारख्या अल्पवयी स्त्रीला एका दूरच्या गावी नेऊन टिळकानी आपले वजन खर्चून दत्तविधान करविले. पूर्वीच्या खटल्यात टिळकावर आलेल्या अनेक आरोपांचा चिरोल साहेबानी उल्लेख केला आहे. त्यात केवळ कायद्याच्या दृष्टीने गैर अशी विधाने चुकून झाली असतील. पण ते काही मी व माझे मित्र यासारखे कायदे-