पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ कोठे गेलो नाही. पण त्यांनी काम चांगले केले असा रिपोर्ट आहे. रँडसाहेबांचे जे वर्णन वाचून दाखविण्यात आले ते खरे नाही. प्रोफेसर गोखल्यानी माझी माफी मागितली त्या पत्राची नक्कल मजजवळ आहे. (या ठिकाणी ही नक्कल दाखल करून घ्यावी की नाही ह्याबद्दल पुष्कळच वाद झाला. शेवटी त्या पत्राचा पुरावा नाकारण्यात आला.) सँडहर्स्ट साहेब पुढे म्हणाले- माझ्याच वेळी टिळ- कांच्यावर खटला झाला. आणि पुढे त्यांजकडून अटी घेऊन त्याना कमी शिक्षेवर सोडण्यात आले. मी फेब्रुअरी १९०० मध्ये विलायतेस परत आलो. तोपर्यंत टिळ- कानी त्या अटी मोडल्या नव्हत्या. ७० सर जॉन सायमन यांजकडून उलट तपासणी प्र०—तुम्ही नुसते गव्हर्नर नसून गव्हर्नर-इन-कौंसिल होता? उ० – होय. प्र० – प्लेग कमिशन तुमच्या कारकिर्दीत नेमले गेले काय? उ० - होय. प्र० – पण निकाल मात्र मागाहून आला? उ० -होय. डार्लिंग – ह्या खटल्याची गोष्ट तशीच होणारशी दिसते. माझ्या आयुष्यात पुरावा आणि माझ्या मृत्यूनंतर ज्यूरीचा निकाल! प्र० - घरांची तपासणी लोकाना अप्रिय नव्हती काय? उ० – नव्हती. प्र० – ह्या कामात लोकांची सहानुभूति अवश्य होती की नाही? उ० – ते मात्र खरे. प्र० - प्लेग पुरवला पण प्लेगव्यवस्था नको असे लोक म्हणत हे तुम्ही ऐकले होते काय? उ०- -लोकानी तसे म्हणणे स्वाभाविकच होते. पण त्याला दुसरीहि बाजू आहे. डार्लिंग – मी एक गोष्ट सांगतो. लॉर्ड डिली ह्यानी असे लिहिले आहे की, त्याना संधिवात झाला तेव्हा त्याना कोणी एका औषधाची शिफारस केली. पण ते घेतल्यावर ते म्हणाले "मला हा रोग पुरवला पण औषध नको! " प्र० - सर्व दर्जाच्या लोकाना सेग्रिगेशन कँपात एकत्र ठेवण्यात येत होते काय? उ०—होय. ते युक्तच होते. डार्लिंग–ह्या लोकसत्तेच्या वादाच्या दिवसात लहान थोर हा दर्जा विसर- लाच पाहिजे. प्र० – पण कित्येक लोकाना विनाकारण ह्या सेग्रिगेशन कँपात राहावे लागले असेल? उ० – तेहि शक्य आहे. प्र० – सगळ्या प्लेगच्या दिवसात पुण्याला तुम्ही दोनदा गेला? उ० -होय. टिळकानी ह्या कामी लोकसेवा केली ती स्ट्रॅची साहेबानीहि मान्य केली आहे. तिची किंमत मी कमी करू इच्छित नाही.