पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ लो० टिळकांचे चरित्र भाग १ परत आल्यावरच झाले. भूपेंद्रबाबू याना पाठविलेले पत्र लोकाना दाखविण्यासारखे नव्हते म्हणून दुसरे एक पत्र वाचून दाखविण्याकरिता पाठवा असे भूपेंद्र यानी गोखल्याना लिहिले आणि ते त्यानी पाठविलेहि . पण दुसरे पत्र पोचण्यापूर्वीच पहिले उघडकीस येऊन सर्व घोटाळा झाला होता. अर्थात् ते पत्र काय होते हे गोख- ल्यानी प्रसिद्ध केले पाहिजे." पण ते त्यानी प्रसिद्ध केले नाही. नंतर बेझंटवाईनीं 'न्यू इंडिया' पत्रात आपल्याकडून म्हणून एक खुलासा केला. त्यात त्यानी असे म्हटले होते की, सुबराव व टिळक याच्या भाषणात टिळक असे म्हणाले की नेमस्त व जहाल यांचे ध्येय एकच असले तरी मार्ग वेगळे आहेत. आणि आम्ही राष्ट्रीयसभेत आल्यास बहुमत मिळवून राष्ट्रीय सभेकडून आमच्या मार्गाना मंजुरी मिळवू. यामुळे सर्व परिस्थिति बदलून समैट बिघडला. पण सरकारशी सहकारिता करण्यास मी तयार. आहे असे शब्द त्यानी ३० ऑगष्ट १९१४ च्या जाहीरनाम्यात प्रत्यक्ष लिहिले होते. सुबराव याशी झालेल्या तोंडी भाषणातील एखादे वाक्य सुबरावानी गोखले याना सांगावे व त्याकरिता त्यानी टिळकाना जबाबदार धरावे पण स्वतःच्या सही- बर जे लेखी विधान टिळकानी प्रसिद्ध केले त्यावर मात्र त्यानी विश्वास ठेवू नये हे आश्चर्य होय. स्वतः बेझंटवाईशी टिळकांची संभाषणे झाली होती त्यात सर- कारावर बहिष्कार घालण्याचे विधान त्यानी केले नव्हते. बरे राष्ट्रीय सभेत बहुमत • मिळवू या विधानाला हरकत घेण्यासारखेहि काही नव्हते. कारण सभा संयुक्त असली तरी तीत प्रत्येक पक्ष आपल्या बाजूला बहुमत मिळविण्याचा प्रयत्न करी- तच असतो. बेझंटवाईच्या या खुलाशाचा आधार घेऊन गोखले यानी आपल्या पत्रात मुख्य मुद्दा टाळला. त्यानी इतर खुलासा केला त्याचा सारांश असाः – “ सुब- राव टिळकांच्याकडून मजकडे येताच त्यानी पहिले शब्द हे उच्चारले की टिळ- काशी समेट करणे अशक्य आहे. ते राष्ट्रीय सभेत आल्यास फिरून पूर्वीचे बाद उपस्थित होतील. शिवाय ते आणखी असे म्हणाले की आम्ही समेटाची जी कलमे पत्करीत आहोत तो फक्त पहिला हप्ता आहे. जाहीर सभानी निवडण्याचा अधिकार आम्हाला हवा. आणि तो आज न मिळाला तर आम्ही उद्या तरी मिळवू, नेमस्तांचे धोरण विरोधमिश्रित सहकारितेचे आहे. आमचे धोरण केवळ विरोधाचे आहे. लहान सहान व थोड्या जागा सरकारने दिल्याने आमचे समा- धान होणार नाही. गोखल्यानी रॉयलकमिशनवर दोन वर्षे घालविली पण त्यापासून आम्हाला सिव्हिल सर्व्हिसमध्ये थोड्याशा अधिक जागा मिळणार इतकेच. आमची मागणी साम्राज्यान्तर्गत स्वराज्याची पण स्वराज्याचीच आहे. आम्ही मजूरपक्षाकडून एखादे बिल पार्लमेंटात आणू आणि त्यावर सर्व शक्ति एकबहूं. आयरिश लोकानी कायदेशीर विरोधाच्या बळावर तीस वर्षात स्वराज्य मिळ- बिले तशीच कायदेशीर अडवणूक आह्माला करावी लागेल. आह्मी राष्ट्रीय सभेत शिरल्यानंतरहि आमचे ह्मणणे काँग्रेसने मान्य न केले तर आह्मी एखादा