पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ काय अब्रू लागून गेली आहे की त्यांची चिरोलसाहेबांच्या अशा लिहिण्याने बेअब्रू होईल? जन्मभर त्यानी इंग्रजांची बदनामीच केली आहे. दुसरे काय केले? आणि अशा इंग्रजांकडून नुकसानभरपाई मागण्याला ते येथे आले आहेत. इंग्रज सरकार म्हणजे इंग्रजी अधिकारी नव्हेत असला सूक्ष्म भेद येथे त्यानी सांगितला आहे तो कोण मानणार? [ या ठिकाणी रँड साहेबांच्या खुनाची सर्व हकीगत कार्सन साहेबानी ज्यूरीला सांगितली आणि फिर्यादीतले या संबं धाच्या मुद्याचे शब्द घेऊन त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर चाफेकर बंधूंच्या सर्वच्या सर्व जबान्या वाचून दाखविल्या व पूर्वी ज्या लेखावरून उलट तपासणी केली ते लेख पुन्हा वाचून दाखवून शिवाजी उत्सव व त्यातील व्याख्याने यांचे वर्णन व त्यावर टीका केली आणि म्हणाले ] "अशा सर्व गोष्टी असता हे टिळक तुमच्यापुढे म्हणतात की 'हा मी टिळक बडा ब्राह्मण पंडित प्रोफेसर संपादक गोब्राहाणांचा कैवारी पशुतुल्य आचरण करणाऱ्या इंग्रजांचा वैरी मी तुम्हाला सांगतो की विशेष परिस्थितीत खून झाले तरी त्याला खून म्हणू नये!' अशा मनुष्याचे वर्णन चिरोल साहेबानी अशा रीतीने केले यात काय गुन्हा झाला? सरकारहि त्यांच्याशी सदयपणानेच वागले. त्यांनी त्यांची शिक्षा कमी केली. तरीपण ते बाहेर येताच बेकायदेशीरपणाचा उपदेश लोकाना कर- ण्याला तयारच! हिंदुस्थानातील इंग्रजी राज्य कसे चालले आहे याविषयी मी चर्चा करीत नाही. टिळकांच्या अंगी देशाभिमान असेल ही गोष्टच मी हवी तरी घेऊन चालतो. मी असेच म्हणतो की ह्याकरिता खून करावा असे वाटत असेल तर त्यानी तसा स्पष्ट उपदेश करावा आणि त्याचा परिणाम भोगावा. पण चोर तो चोर आणि शिरजोर! अशी टिळकांची स्थिति आहे. त्यानी मात्र खनाना उत्तेजन येण्यासारखे वाटेल ते लिहावे बोलावे. पण तशा प्रकारचे ते बोलतात लिहितात असे जर कोणी म्हणाला तर मात्र ती 'माझी बेअब्रू झाली' असे म्हणून हे ओरडत उठणार १" [ या ठिकाणी १९०८ च्या खटल्याचा मुद्दा घेऊन कार्सन साहेबानी दावर यांच्यापुढे शिक्षा झालेले लेख सविस्तर वाचून दाखविले. आणि टिळकाना उद्देशून दावर यानी जे उद्गार काढले त्यावर यानी विशेष जोर दिला. त्यानंतर कान्हेन्याच्या व इतरांच्या जवान्या वाचून दाखविल्या आणि म्हणाले की ]" अशा मनुष्याबद्दल चिरोल साहेबानी असे लिहिले नसते तर त्याना आपले काम योग्य रीतीने करिता आले नाही असेच कोणीहि म्हणाले असते. " दिवस सातवा - (१७ फेब्रुवारी १९१९) या दिवशी कार्सन यानी आपले भाषण पुढे चालू केले. "हिंदुस्थानातून इंग्रजाना हाकलून देण्याचा कट टिळक हे जन्मभर करीत होते असेच मी म्हणतो. आणि टिळकानी ओढून टाकलेल्या आगकाड्या गवतावर पडत नव्हत्या तर गच्च भरलेल्या दारूच्या कोठारावर पडत होत्या. इंग्रजाविरुद्ध द्वेष उत्पन्न कर-