पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कार्सन साहेबांचे भाषण भाग ४ प्र० - तुम्ही ही फिर्याद करण्यापूर्वी सॉलिसिटरचा सल्ला घेतला होता काय? उ० - होय. (ह्या ठिकाणी टिळकांच्या सालिसिटरानी चिरोल व मॅकमिलन कंपनी ह्याना पाठविलेले पत्र दाखल करण्यात आले.) कार्सन– मलाहि एक कागद येथेच दाखल करू द्या. (१९९८ साली युद्धाच्या कायद्याखाली टिळकाना बंदी करण्यात आली होती त्या संबंधाचा.) कार्सन-यात उल्लेखिलेले भाषण है १९१४ सालच्या भाषणाहून वेगळे होते की नाही? उ०-मला वेगळेसे वाटत नाही. प्र० - ह्या मनाईच्या हुकमावर तुम्ही लॉर्ड बुइलिंगडन ह्याना पत्र लिहिले होते काय? उ० – नाही. या ठिकाणी टिळकांची फेरतपासणी संपली. आणि त्यांच्या बॅरिस्टरानी फिर्यादीतर्फे सर्व पुरावा संपला असे कोर्टास कळविले. (८) कार्सन साहेबांचे भाषण नंतर सर एडवर्ड कार्सन यानी प्रतिवादी चिरोल यांच्यातर्फे आपली बाजू मांडण्याला प्रारंभ केला. ते म्हणाले "चिरोलसाहेब हे लंडन टाइम्सचे एक प्रवासी बातमीदार म्हणून प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानातील परिस्थिति पाहण्याकरिता टाइम्सने त्याना पाठविले. हिंदी विषयावर ते तज्ज्ञ असे गणले जातात. ते हिंदुस्थानात कधी फार दिवस राहिले नाहीत. टिळकांचा व त्यांचा द्वेष असण्याचे कारणच नाही. हिंदुस्थानाविषयी सहानुभूति बाळगणाऱ्या मोर्लेसाहेबाना या लेखांचे पुस्तक अर्पण केले आहे. त्याला सर ऑलफ्रेंड लायल यासारख्या तज्ज्ञाने प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकातील कोणत्याहि विधानाबद्दल त्याना खेद होत नाही. त्याना माफी मागून मोकळे व्हावयाचे असते तर ती गोष्ट त्यानी पूर्वीच केली असती. असल्या खट- ल्याला तोंड देणे हे किती तरी खर्चाचे काम आहे! तो खर्च आणि ते श्रम लहा- नशी माफी मागून त्याना वाचविता आले असते. उलट टिळक इतक्या दूरवर मुद्दाम आले ते का हे ज्यूरीच्या लक्षात आलेच असेल. तुमच्याकडून बेअब्रू साफ होऊन वर पैसे मिळतील म्हणून ते येथे आले. टिळकांची विद्वत्ता व तिकडील त्यांची मान्यता कोणीहि नाकबूल करीत नाही. आणि १८९३ पासून १९१८ पर्यंत त्यानी सरकारच्या प्रत्येक अडचणीचा फायदा घेऊन स्वराज्यविषयक आपल्या कल्पना उगवून घेण्याचा प्रयत्न केला. तिकडे ही फिर्याद ते आणते तर त्याना लभ्यांश नव्हता. आज तीन दिवस चाललेल्या उलट तपासणीत काय काय गोष्टी बाहेर पडल्या हे आपण पाहिलेच. त्यांना वाटले असेल विलायतेतील हवा थंड लोकांची मने थंड म्हणून जहाल अशा आपल्या उद्गाराना येथे सौम्य स्वरूप सहजच आणून दाखविता येईल. राजद्रोहकारक भाषा सतत सुरू असता तिचा परिणाम खुनात होत नाही या म्हणण्यात काय अर्थ? वीस वर्षांपूर्वी मुंबई टाइ म्सने माफी मागितली ती आता पुढे आणून काय फायदा? टिळकाना अशी