पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ कार्सन साहेबांचे भाषण ण्याची त्यांनी काही बाकी ठेविली नाही. त्या कामी धर्म चालीरीती शिक्षण उत्सव समारंभ लेख व्याख्याने सभा वगैरे हरएक गोष्टींचा त्यानी उपयोग केला. ही टिळकांची मते प्रामाणिकपणाची असतील की नाही हाच आपणापुढे प्रश्न आहे. अशा मनुष्याचे वजन प्रथम पुण्यात त्यानंतर महाराष्ट्रात त्यानंतर हिंदुस्था- नात पसरावे ही गोष्ट स्वाभाविक आहे. राष्ट्रीय सभेच्या द्वारे त्यांचा इतर पुढा- ज्याशी संबंध आला. टिळकानी राष्ट्रीय सभेत फारसे वक्तृत्व गाजविले नाही. त्याना ती देणगीही नव्हती. पण त्यांचा दुर्दम उद्योग दुसऱ्यावर वचक पाडण्याची त्यांची शैली व प्रत्येक साधनाचा योग्य उपयोग करून घेण्याचे त्यांचे कौशल्य या गुणानी त्यांनी काँग्रेसच्या पुढाऱ्यावरहि वजन पाडले. बंगाल्यात कोणी केसरी वाचीत नसेल. पण त्यांच्याच प्रयत्नाने बंगाल्यात शिवाजी उत्सव सुरू झाला होता. आणि बिपिन पाल अरविंद घोस यासारखे पुढारी त्यांचे भक्त बनले होते. सुरेंद्रनाथ बानर्जी पुढे त्यांच्याशी भांडले पण त्यानीहि प्रथम टिळकांच्या नमुन्यावरूनच आपली चळवळ सुरू केली. कोणीहि त्यांच्या कर्तृत्वशक्तीबद्दल शंका घेत नाही. पण तिचा उपयोग काय केला हे ज्यूरीने पाहिले पाहिजे. अनेक जाती असणाऱ्या हिंदूत राज्य करणे ही किती कठीण गोष्ट होती! अशा काळात टिळकांचा उपद्रव किती झाला असेल याची कल्पना तुम्हाला करिता येईल. त्यांच्या शिकवणीने खून तर झालेच. पण त्याच्यापुढे मजल कशी गेली नाही हेच आश्चर्य! इंग्रजांचे हे सुराज्य नको, त्यांच्या जागी स्वदेशी अराजक पुरवले असेच त्यांनी म्हटले आहे. असे हे टिळक तुमच्याकडून आपली अब्रू साफ करून घेऊन हिंदुस्थानाला परत जाऊन आपला जय मिरवणार! जितके म्हणून वाईट लोक त्या सर्वाना यांची आपली मदत, खुनाच्या चळवळीला ते आपली मदत करीत. खुनाच्या पुस्तकावर चांगला अभिप्राय देऊन ती पुढे आणीत. कोणावरहि खटला झाला तरी हे त्याला मदत करीत. कोणी वर्तमानपत्र काढले तरी त्यांचे बस्तान बसवून देण्याला हे तयारच. तात्पर्य प्रत्येक वाईट मनुष्याशी कोणत्याना कोणत्या तरी रीतीने यांचा संबंध होताच. चेअब्रूच्या म्हणून फिर्यादीत निरनिराळे सहा मुद्दे आणले. पण सर्वोचा पर- स्पराशी निकट संबंध आहे. म्हणून चिरोल साहेबांचे समग्र पुस्तक लक्षात घेऊनच विचार केला पाहिजे. मौज ही की पुस्तकातील एखाद दुसरी चिल्लर गोष्ट घेऊन ही गोष्ट खोटी आहे, हे लिहिण्याने माझी बेअब्रू झाली असा कांगावा ते करितात. पण समजा एखाद्या मनुष्यावर एकाच कोर्टात दोन आरोप आले पैकी त्याने आपल्या सासूचा खून केला ही गोष्ट सिद्ध झाली. पण त्याच कोर्टात त्याने आपल्या सासऱ्याच्या खिशातील तंबाकूची चिलीम चोरली असा आरोप त्याच्यावर आला आणि तो मात्र खोटा ठरला. तर पहिली गोष्ट विसरून जाऊन, दुसऱ्या गोष्टीने होणारी माझी बेअब्रू साफ करून मला नुकसान भरपाई द्या असे म्हणण्यासारखेच हे आहे. पाचशे पानाच्या पुस्तकात एखादे वाक्य चुकून पडले किंवा ते शाबीत करता न आले म्हणून काय झाले? टिळकानी लोकावर कोरडे AU