पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र डार्लिंग – जशी कॉवडेन क्लबची एक चळवळ तशा प्रकारची ही. सायमन – कॉवडेन क्लव हा आपली चळवळ राजद्रोहात्मक मानीत नव्हता. डार्लिंग – अलीकडे राजद्रोहात्मक काय आहे व काय नाही हे ठरविणे मुकिलीचे झाले आहे. प्र० - सावरकरांची व तुमची भेट एकंदर किती वेळा झाली असेल? -साऱ्या जन्मात तीन चार वेळा. उ० प्र० - ताईमहाराज प्रकरणात तुमचा द्रव्यदृष्टीने काही फायदा होता काय? उ०—नव्हता. भाग ४ डार्लिंग–पैशाच्या आशेने इतकाच अप्रामाणिकपणाचा अर्थ नसतो. सायमन—म्हणजे उदाहरणार्थ असेच की नाही की एखादा न्यायाधीश अप्रामाणिक आहे असे म्हटले म्हणजे तो लांच घेतो असाच अर्थ नव्हे तर खटला जितका नि: पक्षपातीपणाने चालवावयाला पाहिजे तितका चालवत नाही. डार्लिंग—तुमचे म्हणणे बरोबर आहे. अप्रामाणिकपणाचे प्रकार अनेक असतात. उलट पक्षी लॉर्ड वेकन हा खटला प्रामाणिकपणे चालवीत असे पण लांच घेत असे. कार्सन– निकालासंबंधाने तुमचे म्हणणे असे काय की चिरोल यानी द्याव्या त्या सर्व गोष्टी निकालात दिल्या नाहीत? उ० – होय. पुराव्याबद्दल त्यांनी काहीच म्हटले नव्हते. खालच्या कोर्टाने आमचे हेतू प्रामाणिक आहेत असे स्वच्छ लिहिले असता त्याचा उल्लेखहि चंदावरकरानी केला नाही. खालच्या कोर्टाने आमचे हेतू प्रामाणिक होते असे म्हटले होते. प्र० – १९१४ मध्ये सर्व फौजदारी फिर्यादीतून तुमची मुक्तता झाल्यावर तशा प्रकारचा कोणताहि आरोप तुमच्यावर चिरोल साहेबांचे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत आला होता काय? उ०-नव्हता. डार्लिंग – प्रिव्ही कौन्सिल झाले तरी चूक करीत नाही काय? त्याच्यावर अपील नाही इतकेच! एकाद्या खटल्यात सहा न्यायाधीश बसले आणि त्यातील चारांचे एकमत झाले तर बाकीच्या दोघाना इतर निकाल देतील तो निमूटपणे ऐकावा लागतो. खाली चंदावरकरानी टिळकाना नावे ठेविली. वर प्रिव्ही कौन्सिलच्या काही न्यायाधीशांचा चंदावरकराशी मतभेद झाला इतकेच. चंदा- वरकरानीहि टिळकाना पैसे खाल्ल्याचे म्हटले नव्हते. तर अल्पवयी विधवेला जो दत्तक नको होता तो आपले वजन घालून घ्यावयाला लावला इतकेच. सायमन–पण तसे करणे हे परिस्थिति म्हणून कर्तव्यच होते. डार्लिंग – दोन मोठे कायदेपंडित झाले म्हणून विधवेला दत्तक अमुकच आवडेल हे ठरविणे त्याना पंचायतीचे नव्हे काय? पण सोडून द्या की तो मुद्दा. ताईमहाराज ही व्यक्ति ह्या खटल्यात महत्त्वाची नाही.