पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची फेरतपासणी ५९ दाखविले ते केसरीतील होते व मी किंवा इतरानी ते लिहिले होते असे टिळका- कडून काढून घेतले. प्र०—तुम्ही स्वराज्याचे अधिकार मागत होता? उ० - होय. कार्सन – तुम्ही सुधारणांची योजना पुराव्यात दाखल करणार असाल तर ती मला पाहून प्रश्न विचारावे लागतील. डार्लिंग – ते काहीच करू नका. आपले हे राजकीय सुधारणांचे कमिशन नव्हे. आणि ज्यूरीला स्वराज्याच्या योजनेवर रिपोर्ट करावयाचा नाही. प्र० – युद्धाच्या वेळी तुम्ही राजनिष्ठेसंबंधाचे उद्गार काढले होते की नाही?—होय. उ०—डार्लिंग – पण त्याचा काय उपयोग? पूर्वीच्या दोन शिक्षा राजद्रोहाच्या कोठे जाणार? शिक्षा भोगून झाल्यावर मग राजनिष्ठेचे उद्गार निघाले की नाही? कासन—शिवाय ते उद्गार हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरचे होते. सायमन- - १९१८ मध्ये टिळकांचे विचार कशा प्रकारचे होते ह्यासंबंधाने प्रश्न आले होते म्हणून हा प्रश्न मला विचारावयाचा आहे. डार्लिंग त्याला १९९४ तील उद्गार काय उपयोग? उद्गाराना गुरुत्वाकर्ष- णाचा कायदा लागतो की काय, की १४ चे उद्गार १८ पर्यंत खाली ओढता यावे? शिक्षा भोगून आल्यावर मनुष्य पश्चात्तापाने आपले विचार बदलीत असतो तसे तेव्हा झाले असेल १ कार्सन – मनुष्याने प्रत्यक्ष काय केले याकरिता त्याचा इनसाफ होत असतो. अमुक गोष्ट मला मान्य नाही तमुक मान्य नाही अशी साक्षीदाराची उत्तरे घेऊन उपयोग काय? मनुष्य चोरी करील व मागाहून म्हणेल की बायबलात चोरी करू नये असे सांगितले आहे. सायमन–पण कार्सन यानी त्याना सर्वसाधारण प्रश्न विचारला होता की 'तुम्ही बादशहासंबंधाने राजनिष्ठ आहा की नाही? ' म्हणून फेर तपासणीत मला हा प्रश्न विचारावा लागत आहे. डार्लिंग – ठीक आहे. तो प्रश्न मी विचारू देतो. प्र० - तुम्ही तुरुंगातून येईपर्यंत तुम्हाला चिरोल साहेबांच्या पुस्तकाची माहिती नव्हती? उ० - नव्हती. (येथे टिळकानी १९१४ मध्ये युद्धासंबंधाने एक पत्र मराठ्यात आपल्या सहीवर प्रसिद्ध केले ते दाखल करण्यात आले.) प्र० - फाळणीसंबंधाने लिहिलेले तुमचे लेख बंगाल्यात कोणी वाचले असतील काय? उ० – नाही. प्र० – बंगाल्यातील स्वदेशी चळवळ तुम्ही सुरू केली काय? उ० – नाही. प्र० -त्या चळवळीत बाँबचा उपयोग होता काय? तिला राजकीय स्वरूप होते काय? उ०-नाही. ती फक्त औद्योगिक चळवळ होती.