पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ प्र०—तळेगावच्या शाळेला तुम्ही मदत केली की नाही? उ० - होय. प्र० - ती समितीच्या कायद्याखाली बंद केली? उ० - होय. प्र० - त्या शाळेचे चालक विजापूरकर याना शिक्षा झाली काय? उ० - होय. प्र० – रा. वि. म. भट याना नाशिकच्या खटल्यात शिक्षा झाली असता तुम्ही त्याना केसरी कचेरीत ठेवले काय? उ० - होय. त्याना मी कचेरीतील काही काम दिले होते. प्र०—ते तुमच्या नोकरीत अजून आहेत काय? उ० - मी इकडे येईपर्यंत तरी होते. प्र०- - असे अर्धवट का सांगता? लाजता का? उ० – राजद्रोहाची शिक्षा झालेले लोक तुमच्या पार्लमेंटातहि वसतात. मला लाजण्याचे हो काय कारण? प्र०—सावरकराना तुम्ही विलायतेला पाठविले काय? उ० – त्यांच्या कॉले- जच्या प्रिन्सिपालकडून सर्टिफिकेट मिळाले होते. त्यावर मी शिफारस केली होती. (या ठिकाणी सावरकरासंबंधीची सर्व हकीगत वाचून दाखवून 'असे मी ऐकले आहे' असे अनेक प्रश्नाना उत्तरादाखल टिळकाकडून वदवून घेतले.) प्र० – नाशिकच्या एका सभेत दारू पिणारांची धिंड काढावी असा ठराव झाला होता काय? उ० – होय. डार्लिंग—मला वाटते गळ्याला बाटली बांधून धिंड काढत असतील. पण याची प्रचीति पाहावयाची असली तर अमेरिकेत जावयाला पाहिजे. दिवस सहावा- (१४ फेब्रुवारी १९१९) (७) सर जॉन सायमन यांनी केलेली टिळकांची फेरतपासणी ह्या दिवशी सर जॉन सायमन यानी टिळकांची फेरतपासणी केली. प्रथम त्यानी ग्लोब व टाइम्स ऑफ इंडिया पत्रानी टिळकांची माफी मागितली ह्या संबंधाचा मजकूर त्यांचेकडून काढून घेतला. प्र० – टाइम्स ऑफ इंडिया हे पत्र सर्व उ० - होय. ते स्वतःला हिंदुस्थानातले हिंदुस्थानभर बाचले जाते ना? पत्र असे म्हणवून घेते. प्र० - चाफेकर यानी आपल्या सगळ्या जबानीत कोठे तरी तुमचे नाव घेतले होते काय? उ० – नाही. प्र० – मुझफर नगर म्हणजे जेथे बाँबचे अत्याचार झाले ती जागा पुण्या- पासून किती लांत्र आहे? उ०- - सुमारे १२०० मैल तरी असेल.. ५०- -बंगाल्यात केसरी कोणी तरी वाचतो काय? उ० – मुळीच नाही. प्र० – १९१० पर्यंत महाराष्ट्रात बाँचचे अत्याचार झाले होते काय? उ० नाही. (१९१० पर्यंत म्हणजे चिरोल साहेबानी हे पुस्तक लिहिले तोपर्यंत) येथे सर सायमन ह्यानी टिळकानी अत्याचाराचा निषेध केलेले उतारे वाचून