पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची उलट तपासणी प्र० तिच्या गळ्यात नरकपालांची माळ असते काय? उ० – तिचे असे स्वरूप वर्णिले आहे खरे. प्र० बंगाल्यातील शिवाजी उत्सवात बहिष्काराचा विषय घातला होता काय? उ०- -होय. पुष्कळ ठिकाणी एकात दुसऱ्याची मिसळ झाली होती हे मला माहित आहे.

प्र०- -'विचाराने स्वदेशी' म्हणजे काय? उ० –सर्व तऱ्हेने स्वदेशी. डार्लिंग मी त्याचा अर्थ सांगतो. सोमवारी तेवढी स्वदेशी साखर खावी आणि एरवी परदेशी खावी असे नाही. ते व्रतच स्वदेशी म्हटले की कायमचे स्वदेशी. प्र० - परदेशी कल्पना म्हणजे काय? इंग्रजीच काय? उ० -नव्हे ज्यानी ज्यानी म्हणून राष्ट्राची वाढ खुंटते त्या. प्र०- -हिंदुस्थानातून यच्चयावत् परदेशी असेल ते गेले म्हणजे बाकी काय राहिले? उ०-त्याचे येथे कशाला? येथे इतकेच आहे की आमच्या कल्पना सर्व इंग्रजमय होऊन चालल्या आहेत त्या न व्हाव्या. प्र० – स्वदेशी व्रत न पाळणाराला मृत्यूचे प्रायश्चित्त सांगितले होते काय? उ० नाही. व्रत हे पवित्र असते व ते मोडले तर ईश्वराचा कोप होतो इत- काच त्याचा अर्थ. प्र० - तुम्ही स्वतः स्वदेशी व्रत घेतले होते काय? उ०—होते. प्र० – तुम्ही विलायतेत साखर खाल्ली तर हा तुमचा खटला बुडण्याची शिक्षा ईश्वर तुम्हाला करील असे तुम्हाला वाटते काय? उ० - हे विचारण्यात तुम्ही फारच वहावत चालला आहात! प्र०–विलायतेतील कोर्टाचा कायदा हा परदेशी कायदा म्हणून तुमच्या बताला बाधक होत नाही काय? उ० – कायद्याला कोणी परकी म्हणत नाही. प्र० - सर जॉन सायमन हे तरी स्वदेशी वकील कोठे आहेत? उ० –स्वदेशी व्रतात कोर्ट व कायदा असल्या गोष्टी येत नाहीत. संसारातील गोष्टी येतात. प्र० - स्वदेशी चळवळीत काही अत्याचार झाले होते की नाही? उ० - बंगाल्यात काही झाले होते. प्र० - ते थांबविण्याचे प्रयत्न तुम्ही केले की नाही? उ० – बंगाल्यातील अत्याचार मी कसे थांबविणार? प्र० पैसाफंडाचा उपयोग राजकीय होत होता की नाही? उ० - नाही. त्याचे स्वयंसेवक वेगळे होते. प्र० - विद्यार्थ्याना तुम्ही राजकीय चळवळीत घालीत होता की नाही? उ०- त्यानी व्याख्यानाना जाऊ नये ह्या नियमांचा मी निषेध करीत होतो.