पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ प्र० – सुटकेनंतर तुमची व जाईल्स साहेबांची गांठ पडली होती काय? - होय. उ०- प्र० - तुम्ही काही कामाकरिता त्यांजकडे गेला होता काय? उ० - माझ्या एका स्नेह्याने पूर्वी मराठी कोश तयार केला होता. त्याला सरकार मदत देणार होते. ती द्याल काय म्हणून विचारावयाला गेलो होतो. प्र० -त्यावेळी केसरीच्या धोरणाचा विषय निघाला होता काय? उ०—होय, प्र० आणि तुम्ही तेव्हा त्याना असे म्हणाला की केवळ सनदशीर चळवळ करून काही उपयोग नाही. उ०–तसे म्हटल्याचे मला आठवत नाही. निःशस्त्र प्रतिकाराची जोड नेहमीच्या चळवळीला केव्हा केव्हा द्यावी लागते असे मी म्हटले असेन. प्र० - ह्या इंग्रज लोकाशी युक्तिवाद करून काही फळ नाही असे तुम्ही म्हणाला काय? उ० –नाही. प्र०–चांगल्या इंग्रजी राज्यापेक्षा वाईट देशी राज्य पुरवेल असे तुम्ही म्हणाला काय? उ०- स्वराज्याची तहान सुराज्याने भागत नाही असे म्हणतातच. प्र० - तुम्ही काही परदेशी मालाच्या होळ्या केल्या? उ० – ज्या वस्तू इकडे मिळत असता लोक वापरतात अशांच्या. प्र०—ह्या होळ्यांचा हेतू काय होता? उ० – देशी उद्योगधंद्याकडे प्रवृत्ती व्हावी हा. प्र०—केसरीला आपण इंग्रजी कागद वापरणार नाही तर जर्मन ऑस्ट्रिअन वापरू इतर कोणताहि वापरू असे तुम्ही लिहिले काय? उ० – माझ्या वर्त- मानपत्राला इंग्रजी कागद हवा तसा मिळत नाही. म्हणून त्या कागदावर केसरी कधी छापिलाच जात नाही. पूर्वीपासून मी जर्मन ऑस्ट्रिअन कागदच वापरीत होतो. प्र० – स्वदेशी चळवळीला राजकीय स्वरूप कोणी दिले? उ० – प्रथम बंगाल्यात दिले गेले. प्र० – तुम्ही ती चळवळ उचलून का धरली? उ०- राष्ट्राची गान्हाणी सरकारच्या नजरेला आणण्याचा तो एक उपाय म्हणून काँग्रेसच्या पुढाऱ्यानी ठरविले होते. प्र० –स्वदेशी चळवळीत लोक शपथा घेत होते काय? उ०—होय. प्र० - नाशकास शिवाजी उत्सवात स्वदेशी चळवळ मिसळलेली नव्हती काय? उ० – ह्या उत्सवात ते लोक फक्त स्वदेशी साखर खात असे दिसते. प्र० – भवानी ही शिवाजीची देवता होती काय? उ० - होय. -