पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भांग ४ टिळकांची उलट तपासणी प्र० – लोकाना चिथावण्याकरिता हे सर्व तुम्ही लिहिले असेच की नाही? उ० – तक्रारी जगजाहीर करण्याकरिता तसे लिहिले. बंडच करावयाला सांगा- वयाचे असते तर तसे स्पष्ट लिहिले असते. प्र०—सुशिक्षित लोक प्लेगात गाव सोडून गेले याबद्दल तक्रारी केल्या होत्या? उ० - होय. त्यांनी गावात राहून लोकांचे दुःख निवारण करण्याला उपाय योजिले पाहिजे होते असे माझे मत होते. डार्लिंग –सर एडवर्ड कार्सन! मी तुम्हाला पुन्हा विचारतो की असला खुलासा घेत बसण्यात काय अर्थ? ज्यूरी योग्य ते अनुमान काढीलच. प्र०—दरबाराच्या प्रसंगी राजेलोकाना नीट वागविले नाही असे तुम्ही लिहिले? उ० – होय. वर्तमानपत्रातून तसा काही मजकूर आला होता. प्र० -शिवाजी उत्सवाला राजकीय स्वरूप नव्हते काय? उ० – नव्हते. -सोठ्या माणसा सामान्य नियम नाहीत असे उ० - होय. गीतेत तसेच सांगितले आहे. प्र०? प्र० - ती गोष्ट खुनाला लागू करावयाची काय? उ०—गीतेतल्या सारख्या मोठ्या युद्धाला ती गोष्ट लागू होईल खनाला नाही. प्र०- तुम्ही रँड साहेबाविरुद्ध लिहिले ह्याचे तुम्हाला वाईट वाटत नाही काय? उ० – खुनापुरते वाईट वाटते. पण प्लेगच्या जुलुमाबद्दल लिहिले त्याचे वाईट वाटत नाही. प्र०—प्रो० गोखले तुम्हाला ठाऊक होते काय? उ० - होय. प्र० –सोजीरानी बायकावर जुलूम केला असे म्हटल्याबद्दल त्यानी माफी मागितली होती काय? उ०—होय. प्र० - त्याबद्दल तुम्ही त्याना नावे ठेविली काय? उ०-आपल्या माफीच्या पत्रात त्यांनी विनाकारण नसता मजकूर घातला होता म्हणून. प्र० – कर्नल के याना प्लेगची व्यवस्था चांगली केल्याबद्दल पानसुपान्या केल्या की नाही? उ०- - होय. त्यांची व्यवस्था लोकप्रिय झाली म्हणून केल्या. दिवस पाचवा - (१३ फेब्रुवारी १९१९) प्र० - -स्टॅची साहेबानी १८९७ च्या खटल्यात तुम्हाला दोष दिला की नाही? -होय. उ० प्र०- -शिक्षेतून मुदतीपूर्वी सुटताना तुम्ही मी बाचून दाखवितो त्या दोन अटी लिहून दिल्या की नाही?

डार्लिंग - इकडे ज्याला Ticket of loave म्हणतात तशावर टिळकाना तेव्हा सोडले होते असे दिसते.