पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ लो० टिळकांचे चरित्र भांग ४ प्र० - प्रेग झाला नसता लोकाना इस्पितळात नेत हे खरे आहे काय? उ०- रोगाच्या संशयावरून नेत हे खरे. पण रोग असलेले व नसलेले आणि रोग झालेले व न झालेले एकाच इमारतीत ठेवीत. डार्लिंग – रँड साहेबांचा खून झाला या गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटले काय? उ० – त्यांच्या कृत्यामुळे ती गोष्ट घडली असे मला वाटले. प्र० – लोकाना त्रास व्हावा म्हणून रँड साहेबांची नेमणूक केली असे तुम्ही सुचविले हे दुष्टपणाचे नव्हे काय? उ० – लोकाना तसे वाटण्याजोगे होते. प्र० – का? उ०—लोकाना रँड साहेबाविषयी माहिती होती म्हणून. प्र० - स्वतः तुम्हाला तसे वाटले काय? उ० - नाही. पण सामान्य लोकाना काय कसे वाटले हे कोणी सांगावे? प्र०—प्लेगव्यवस्था न केली असती तर प्लेग कसा जाणार होता? उ०—व्यवस्था हवीच होती. पण कित्येक वेळा लोकाना असे वाटे की प्लेगने मेलो तरी बरे. पण प्लेगव्यवस्थेचे हे दुःख नको. प्र०—आता शिवाजीकडे वळू. शिवाजीपासून बोध काय घ्यावयाचा? शत्रूला मारण्याचा? उ० – नाही. स्वाभिमान स्वावलंबन उद्योगशीलता देशाभिमान वगैरेचा. प्र० - लेगच्या जुलुमाला उद्देशून हे लिहिले? उ० – नाही. तो उत्सव- प्रसंगच होता. त्यावर्षी त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आल्या. प्र० – शिवाजीचा पुन्हा अवतार व्हावा असे तुम्ही लिहिले? उ० – शिवाजी सारख्या देशाभिमानी विभूती पुन्हा निपजाव्या असे सर्वच म्हणतात. प्र० - शिवाजीने सर्वात चांगली गोष्ट कोणती केली? उ० – हिंदुपदपाद - शाही स्थापली.. प्र०—ती अफझुलखानाला मारून? उ०- त्यांच्या कारकीर्दीतले ते फक्त एक कृत्य होते. प्र० – अफझुलखानाचा वध केला नसता तर राज्य स्थापले गेले नसते काय? उ०—काय झाले नसते आणि काय झाले असते हे मी कसे सांगू? प्र० - दुष्काळी पीडेला उद्देशून शिवाजीविषयी लिहिले काय? उ० – नाही. तेव्हाहि दुष्काळाच्या दिवसात शिवाजी उत्सव आला होता. प्र० – बाहेरगावचे लोक मुंबईत आल्याने त्याना दुःस्थिति येते असे तुम्ही लिहिले काय? उ० - रस्किन यानेहि आधुनिक सुधारणेबद्दल लिहिताना तसे म्हटले आहे. प्र० – तुम्ही मोठे विद्वान व बुद्धिवान आहा असे लोक म्हणतात. उ०. ते मी काय सांगू?